अस्त्र II क्षेपणास्त्र आता आणखी घातक होणार
डीआरडीओला मिळाला चीनच्या पीएल‑15 मिसाइलचा फॉर्म्युला नवी दिल्ली, 18 ऑक्टोबर (हिं.स.) : डीआरडीओ आता अस्त्र मार्क‑2 मिसाइल अधिक घातक बनवण्याच्या तयारीत आहे. यासाठी चीनची पीएल‑15 मिसाइलची काही खास वैशिष्ट्ये या प्रकल्पात समाविष्ट केली जात आहेत. पाकिस
अस्त्र क्षेपणास्त्राचा संग्रहित फोटो


डीआरडीओला मिळाला चीनच्या पीएल‑15 मिसाइलचा फॉर्म्युला

नवी दिल्ली, 18 ऑक्टोबर (हिं.स.) : डीआरडीओ आता अस्त्र मार्क‑2 मिसाइल अधिक घातक बनवण्याच्या तयारीत आहे. यासाठी चीनची पीएल‑15 मिसाइलची काही खास वैशिष्ट्ये या प्रकल्पात समाविष्ट केली जात आहेत. पाकिस्तानने भारतावर सोडलेले चीनी बनावटीचे पीएल-15ई हे मिसाईल पंजाबच्या एका शेतात आढळले होते. या मिसाइलमध्ये अनेक प्रगत तंत्रे होती, जी आता भारतीय मिसाइल विकासात समाविष्ट केली जातील.

भारत आपली संरक्षणव्यवस्था सतत्याने अद्यावत बनवतोय. देशांतर्गत तंत्रज्ञानावर आधारित मिसाइल आणि फायटर जेट्स तयार करण्याच्या मोहिमेला वेग देण्यात आला आहे. याच क्रमात, भारतीय संरक्षण संशोधन व विकास संघटनेने (डीआरडीओ) चीनच्या पीएल‑15ई मिसाइलचे विश्लेषण केल्यानंतर त्यातील काही प्रगत वैशिष्ट्ये अस्त्र मार्क‑2 प्रकल्पात समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑपरेशन सिंदूरदरम्यान पाकिस्तानने सोडलेल्या पीएल-15-ई मिसाईलचे विश्लेषण केल्यानंतर डीआरडीओने हे पाऊल उचलले आहे. हे मिसाइल पाकिस्तानी एअर फोर्सच्या जेएफ‑17 किंवा जे‑10सी लढाऊ विमानातून सोडण्यात आली असावी, आणि ही पंजाबमधील होशियारपूरजवळील एका शेतात आढळली होते. टार्गेट हिट करण्यात अपयशी ठरलेले हे मिलाईल 9 मे रोजी होशियारपूरजवळील एका शेतातून सुरक्षितपणे हस्तगत करण्यात आले होते. भारतीय संरक्षण संशोधकांसाठी ही एक सुवर्णसंधी होती. भारतीय हवाई आक्रमक क्षेपणास्त्रांपेक्षा वेगळेपण म्हणून, या शस्त्रामध्ये आत्मविनाश यंत्रणा नसल्यामुळे ती विस्फोट न होता सापडली. नंतर तिच्या तांत्रिक वैशिष्ट्यांची तपासणी करण्यात आली. या तपासणीनंतर डीआरडीओने पीएल‑15 मधील महत्त्वाच्या तंत्रज्ञानाचा समावेश अस्त्र मार्क‑2 मध्ये करण्याचा निर्णय घेतला आहे. डीआरडीओने आपला विश्लेषण अहवाल संरक्षण मंत्रालयाकडे सादर केला आहे, परंतु त्याबाबत अद्याप सार्वजनिकपणे कोणतीही माहिती उघड केलेली नाही.

यासंदर्भात सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मिसाईलच्या तपासणीत चीनी शस्त्रात अनेक उत्कृष्ट वैशिष्ट्ये समोर आली आहेत. त्यात प्रगत प्रणोदकासह एक लघु सक्रिय इलेक्ट्रॉनिक स्कॅन्ड ऍरे (एईएसए) रडार आहे, जो मॅक‑5 पेक्षा जास्त गती राखू शकतो आणि अत्याधुनिक अँटी‑जॅमिंग क्षमता याहीत. या सर्व प्रगत तंत्रज्ञान — विशेषतः रडार तंत्रज्ञानाला भारताच्या स्वदेशी अस्त्र विकास कार्यक्रमात समाविष्ट केले जात आहे.

दुसरीकडे, पाकिस्तानी एअर फोर्स कथितरीत्या चीनकडून दीर्घपर्यायी पीएल‑17 मिसाइल खरेदी करण्याचा प्रयत्न करत आहे, तसेच तुर्कीकडून 2000 YİHA कामिकेझ ड्रोन विकत घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे आणि अमेरिकेकडे उच्च‑तंत्रज्ञानाच्या शस्त्रांची यादीही सादर केल्याचे सांगितले जाते.

याच वेळी, भारताचे संरक्षण नियोजक राफेल लढाऊ विमानांसाठी अतिरिक्त मेटियोर मिसाइल खरेदी करण्याच्या दिशेने पुढे चालले आहेत, ज्यामुळे भविष्यात भारतीय वायुसेनेला संख्यात्मक कमतरतेचा सामना करावा लागू नये. तसेच सुमारे 800 किलोमीटरपर्यंतची मारक क्षमता असलेली पुढील पिढीची ब्रह्मोस मिसाइलदेखील विकसित केली जात आहे.

-----------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande