नाशिक, 18 ऑक्टोबर (हिं.स.)।सप्टेंबर मध्ये झालेल्या पावसात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले त्याची नुकसान भरपाई देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती त्याबाबतचा लेखी आदेश शासनाने शनिवारी काढले आहेत यामध्ये उत्तर महाराष्ट्रातील 15 लाख 79 हजार 269 शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानाची भरपाई मिळणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे दिवाळीत शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे
सप्टेंबर 25 मध्ये संपूर्ण राज्यामध्ये जोरदार पाऊस झाला होता या पावसामुळे मोठा हाहाकार माजला होता विशेष करून मराठवाडा उत्तर महाराष्ट्र विदर्भातील काही भाग या ठिकाणी मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर आली होती त्याबाबत राज्य सरकारने तातडीने प्रशासनाला नुकसान भरपाई बाबत पंचनामे करण्याचे आणि अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेले होते. हा अहवाल सादर झाल्यानंतर राज्य सरकारने आता शनिवारी सकाळी याबाबतचा आदेश काढला असून नुकसान भरपाईची रक्कम ही जिल्हा प्रशासनाकडे देण्यात आलेली आहे.
या पावसामध्ये उत्तर महाराष्ट्रातील नाशिक धुळे नंदुरबार जळगाव आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये 15 लाख 79 हजार 269 शेतकऱ्यांची अकरा लाख 50 हजार 3001 हेक्टरचे नुकसान झाले आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्यात चार लाख 9 हजार चार लाख 9 474 शेतकरी असून 2 लाख 88 हजार 806 हेक्टर मध्ये नुकसान झाले आहे त्यापैकी नाशिक जिल्ह्याला यामध्ये 317 कोटी 15 लाख 77 हजार रुपयांची नुकसान भरपाई मिळालेली आहे धुळे जिल्ह्यामध्ये 16,357 शेतकऱ्यांचे 11994 हेक्टरवर नुकसान झाले होते या ठिकाणी एक कोटी 22 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आलेली आहे तर नंदुरबार जिल्ह्यात 931 शेतकऱ्यांचे 445 हेक्टरवर नुकसान झाले होते या ठिकाणी 53 लाख रुपयांची मदत देण्यात आलेली आहे.
जळगाव जिल्ह्यामध्ये 3 लाख 25 हजार 359 शेतकऱ्यांचे दोन लाख 74 हजार 262 हेक्टरवर नुकसान झाले होते या ठिकाणी 299. 94 कोटी रुपयांची मदत करण्यात आलेली आहे तर अहिल्यानगर या ठिकाणी आठ लाख 27 हजार 118 शेतकऱ्यांची सुमारे सहा लाख हेक्टर वर नुकसान झाले होते या ठिकाणी शासनाने 846 कोटी रुपयांची मदत दिलेली आहे लवकरच शेतकऱ्यांना ही मदत दिली जाणार आहे त्याबाबतची सर्व कारवाई ही जिल्हा प्रशासनाने करावयाचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV