दावा न केलेल्या ठेवींच्या वितरणाकरिता 24 ऑक्टोबरला चंद्रपूर जिल्हास्तरीय शिबिराचे आयोजन
चंद्रपूर, 18 ऑक्टोबर (हिं.स.)। चंद्रपुर जिल्ह्यातील विविध बँकांमधील वैयक्तिक, संस्थात्मक आणि सरकारी योजनांच्या खात्यांमध्ये सुमारे 88 कोटी रुपयांच्या दावा न केलेल्या ठेवी शिल्लक आहेत. या ठेवींचा एकूण 3 लक्ष 76 हजार 242 खातेदारांना परतावा मिळवून दे
दावा न केलेल्या ठेवींच्या वितरणाकरिता 24 ऑक्टोबरला चंद्रपूर जिल्हास्तरीय शिबिराचे आयोजन


चंद्रपूर, 18 ऑक्टोबर (हिं.स.)।

चंद्रपुर जिल्ह्यातील विविध बँकांमधील वैयक्तिक, संस्थात्मक आणि सरकारी योजनांच्या खात्यांमध्ये सुमारे 88 कोटी रुपयांच्या दावा न केलेल्या ठेवी शिल्लक आहेत. या ठेवींचा एकूण 3 लक्ष 76 हजार 242 खातेदारांना परतावा मिळवून देण्यासाठी 24 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील दावा न केलेल्या ठेवींच्या रकमेचे लाभ संबंधित ठेवीदारांना किंवा त्यांच्या वारसांना देण्यात येणार आहेत.

या उपक्रमाचा उद्देश नागरिकांपर्यंत त्यांच्या न मिळालेल्या ठेवींची माहिती पोहोचवून त्या परत मिळविण्यासाठी मदत करणे हा आहे. या निमित्ताने सर्व बँकांनी दावा न केलेल्या ठेवींची माहिती जनतेपर्यंत पोहोचवावी आणि ठेवीदारांनी आवश्यक कागदपत्रांसह शिबिरात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande