कोल्हापूर, 18 ऑक्टोबर (हिं.स.)।
स्त्रीशक्तीचा गौरव करणारा आणि प्रेरणादायी असा ‘मर्दिनी’ हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीत एक नवा अध्याय लिहिणार आहे. या चित्रपटाच्या यशासाठी अभिनेता व निर्माता श्रेयस तळपदे आणि सिनेमाचे दिग्दर्शक अजय मयेकर यांनी नुकतीच कोल्हापूरच्या अंबाबाई देवीच्या मंदिरात भेट देऊन देवीचे आशीर्वाद घेतले.
या पवित्र भेटीदरम्यान दोघांनी देवीसमोर मनोभावे प्रार्थना केली त्याच बरोबर ‘मर्दिनी’ चित्रपटाचे पोस्टर अंबाबाई देवीच्या पवित्र चरणी अर्पण केले आणि चित्रपटाच्या यशस्वी प्रवासासाठी देवीचे आशीर्वाद घेतले.
श्रेयस तळपदे आणि ॲफ्लुएन्स मोशन पिक्चर्स प्रा. लि.मर्दिनी हे केवळ एक शीर्षक नसून, एक प्रतीक आहे. हा चित्रपट समाजातील प्रत्येक स्त्रीच्या आत्म्यातील मर्दिनीला ओळखण्यास आणि जागृत करण्यासाठी एक सिनेमॅटिक प्रयत्न आहे. हा चित्रपट सादर करणार आहे की, असू देत लाख महिषासुर... पुरे आहे फक्त एक 'मर्दिनी'. दिग्दर्शक अजय मयेकर यांचे या चित्रपटाद्वारे चित्रपट दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण होत आहे.
कलाकारांची निवड, संगीत या बद्दलची माहिती लवकरच प्रेक्षकांना मिळेल. ‘मर्दिनी’ हा चित्रपट येत्या २०२६ साली मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार असून, मराठी प्रेक्षकांसाठी हा एक प्रेरणादायी, भावनिक आणि शक्तिशाली अनुभव ठरणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar