सोलापूर, 19 ऑक्टोबर (हिं.स.)।
जिल्हा परिषदेचे सदस्य पदाचे आरक्षण पडल्यापासून सोलापुरातील राजकीय समीकरणे बदलण्यास सुरुवात झाली आहे. ही निवडणूक बहुतांश चिन्ह ऐवजी आघाड्या करून लढवल्या जातील अशी शक्यता सध्या दिसत आहे.
उत्तर सोलापूर तालुक्यातील ज्येष्ठ नेते राष्ट्रवादीचे माजी अध्यक्ष बळीराम काका साठे यांचा नान्नज गट ओबीसीसाठी राखीव झाल्याने टेन्शनमध्ये आलेल्या काकांनी पर्याय म्हणून बीबीदारफळ सर्वसाधारण गटात जाण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. सिंहासन न्यूज ने लावलेल्या बातमी पासून काका साठे यांची शेवटची निवडणूक असल्याचा भावनिक मुद्दा आता उत्तर तालुक्यात तयार होऊ लागला आहे.
पण काका साठे यांच्यासाठी बीबीदारफळ गट वाटतो तितका सोपा नाही. दोन दिवसांपूर्वी दिलीप माने आणि काका साठे एकत्र येणार अशा बातम्या लागून आल्या. त्यावेळी काका साठे यांनी सुद्धा दुजोरा दिला होता. माने साठे एकत्र येण्याच्या चर्चेने अनेक राजकीय नेत्यांना टेन्शन आल्याचे दिसून आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड