नव्या गाड्या असूनही दिवाळीच्या काळात प्रवाशांची गैरसोय
पुणे, 19 ऑक्टोबर, (हिं.स.)। ग्रामीण भागातील दळणवळणाचा मुख्य आधार असलेल्या एसटीला गेल्या काही महिन्यांत नवीन गाड्या मिळाल्या आहेत. परंतु, त्या तुलनेत चालक आणि वाहकांची संख्या पुरेशी नसल्याने अनेक गाड्या धावू शकत नाहीत, अशी स्थिती आहे. चालक-वाहकांच्
PMPML


पुणे, 19 ऑक्टोबर, (हिं.स.)।

ग्रामीण भागातील दळणवळणाचा मुख्य आधार असलेल्या एसटीला गेल्या काही महिन्यांत नवीन गाड्या मिळाल्या आहेत. परंतु, त्या तुलनेत चालक आणि वाहकांची संख्या पुरेशी नसल्याने अनेक गाड्या धावू शकत नाहीत, अशी स्थिती आहे. चालक-वाहकांच्या कमतरतेचा फटका दिवाळीच्या काळात प्रवाशांना बसण्याची चिन्हे आहेत. यामुळे प्रवाशांची गैरसोय होणार आहे.

चालक-वाहकांच्या कमतरतेमुळे अतिरिक्त फेऱ्या, जास्त वेळ काम करावे लागल्याने चालक-वाहकांची मानसिकता बिघडत आहे. त्यांच्यावर कामाचा ताण येत असल्याने त्यांना थकवा जाणवत असल्याचे काहींनी सांगितले. पुणे विभागात कोविडपूर्वी 1,100 एसटी गाड्या होत्या. सध्या फक्त 850 एसटी गाड्या उपयुक्त स्थितीत आहेत. या विभागाला सुमारे 200 वाहकांची गरज असल्याचे सांगण्यात आले. राज्यातील एकूण एसटी गाड्यांची संख्या अंदाजे सुमारे 15 हजार 500 ते 16 हजार दरम्यान असून जवळपास अंदाजे 3 हजार एसटी चालक-वाहकांची कमतरता असल्याचे समोर आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande