घराघरातील दिव्यांच्या ज्योतींनी भारताच्या सामूहिक प्रगतीसाठी प्रकाशाचा मार्ग दाखवावा - उपराष्ट्रपती
नवी दिल्ली, 19 ऑक्टोबर (हिं.स.) - भारताचे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी दीपावलीच्या पावन प्रसंगी देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. एका संदेशात त्यांनी म्हटले आहे की, दीपावली हा सण म्हणजे वाईटावर चांगुलपणाच्या आणि अज्ञानावर ज्ञानाच्या विजय
सीपी राधाकृष्णन


नवी दिल्ली, 19 ऑक्टोबर (हिं.स.) - भारताचे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी दीपावलीच्या पावन प्रसंगी देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.

एका संदेशात त्यांनी म्हटले आहे की, दीपावली हा सण म्हणजे वाईटावर चांगुलपणाच्या आणि अज्ञानावर ज्ञानाच्या विजयाचे प्रतीक आहे. दीपावली हा असा काळ आहे जेव्हा उदारता, दानशीलता आणि सर्वसमावेशकता या आपल्या संस्कृतीत खोलवर रुजलेल्या मूल्यांचा प्रकाश पसरतो, कारण आपण गरजू आणि वंचित घटकांना आपले सहकार्य आणि मदत देतो.

त्यांनी पुढे म्हटले की, आपण दीपावली साजरी करत असताना, आपल्याला नकारात्मकता आणि अधर्माचा त्याग करून सकारात्मकता आणि धर्माचा स्वीकार करायला हवा, केवळ आपल्या व्यक्तिगत कल्याणासाठीच नव्हे तर राष्ट्राच्या एकूण प्रगतीसाठीही.

सी. पी. राधाकृष्णन यांनी पुढे सांगितले की, जशी प्रत्येक घरातील दिव्यांची ज्योत या सणात एकत्रितपणे रात्रीच्या आकाशाला उजळवते, तशीच आपली निष्ठा आणि बांधिलकी भारताच्या सामूहिक प्रगतीसाठी प्रकाशाचा मार्ग दाखवावी.

सर्वांना शांतता, समृद्धी आणि उत्तम आरोग्य लाभावे, यासाठी त्यांनी देवी लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करून सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

उपराष्ट्रपतींच्या संदेशाचा मजकूर पुढीलप्रमाणे आहे:

दीपावलीच्या पावन प्रसंगी, मी सर्व भारतीय आणि भारताचे मित्र, देशात तसेच परदेशात असलेल्यांना, हार्दिक शुभेच्छा देतो.

दीपावली हा सण चांगुलपणाचा वाईटावर आणि ज्ञानाचा अज्ञानावर विजय साजरा करणारा आहे. हा असा काळ आहे जेव्हा उदारता, दानशीलता आणि सर्वसमावेशकता ही आपल्या संस्कृतीत खोलवर रुजलेली मूल्ये अधिक स्पष्टपणे दिसून येतात, कारण आपण गरजू आणि वंचित घटकांप्रति आपले सहकार्य आणि मदत वाढवतो.

या वर्षी, दीपावली साजरी करताना, आपण सर्वांनी केवळ आपल्या व्यक्तिगत कल्याणासाठीच नव्हे, तर राष्ट्राच्या एकूण प्रगतीसाठीही नकारात्मकता आणि अधर्माचा त्याग करून सकारात्मकता आणि धर्माचा स्वीकार करावा.

जशी प्रत्येक घरातील दिव्यांची ज्योत एकत्रितपणे रात्रीचे आकाश उजळवते, तशीच आपली निष्ठा आणि बांधिलकी भारताच्या सामूहिक प्रगतीसाठी उज्ज्वल भविष्य निर्माण करो.

मी देवी लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करतो की, आपणा सर्वांवर शांतता, समृद्धी आणि उत्तम आरोग्यासाठी आशीर्वादाचा वर्षाव होवो.

शुभ दीपावली!

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande