नवी दिल्ली, २० ऑक्टोबर (हिं.स.). राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आज भारत आणि परदेशातील सर्व भारतीयांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. प्रत्येकाने सोशल मीडियावर आपल्या शुभेच्छा पोस्ट केल्या.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांंनी सोशल मीडियावर लिहीले की, भारत आणि परदेशातील सर्व भारतीयांना दिवाळीच्या शुभेच्छा. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिले की, दिवाळीच्या सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा. प्रकाशाचा हा पवित्र सण सर्वांचे जीवन आनंदाने, समृद्धीने आणि सौहार्दाने उजळून टाको. ही माझी इच्छा आहे.
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी लिहिले की, प्रकाश आणि आनंदाचा सण असलेल्या दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मी सर्वांच्या आरोग्यासाठी आणि समृद्धीसाठी भगवान श्री रामाकडे प्रार्थना करतो.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे