इस्लामाबाद, 19 ऑक्टोबर (हिं.स.)पुढील महिन्यात पाकिस्तानमध्ये होणाऱ्या टी-२० तिरंगी मालिकेत झिम्बाब्वे अफगाणिस्तानऐवजी खेळणार आहे. तीन देशांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय स्पर्धेत झिम्बाब्वेचा संघ अफगाणिस्तानची जागा घेणार आहे. ही तिरंगी मालिका १७ ते २९ नोव्हेंबर दरम्यान पाकिस्तानमध्ये होणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ही घोषणा केली आहे. पाकिस्तानी हवाई हल्ल्यात त्यांच्या तीन क्रिकेटपटूंचा मृत्यू झाल्यामुळे अफगाणिस्तानने शनिवारी, या स्पर्धेसाठी आपला संघ पाकिस्तानला पाठवणार नसल्याचे जाहीर केले होते.
रावळपिंडीमध्ये सुरू होणाऱ्या या स्पर्धेत सहभागी होणारा श्रीलंका हा तिसरा संघ आहे. झिम्बाब्वेच्या सहभागाची घोषणा करताना पीसीबीने फक्त असे सांगितले की, अफगाणिस्तानने सहभागी होण्यास असमर्थता दर्शवली आहे. १७ ते २९ नोव्हेंबर दरम्यान रावळपिंडी आणि लाहोर येथे होणाऱ्या टी-२० आंतरराष्ट्रीय तिरंगी मालिकेत सहभागी होण्यासाठी झिम्बाब्वे क्रिकेटने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे आमंत्रण स्वीकारले आहे. तर श्रीलंकेच्या संघाचाही समावेश आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे