लातूर, 20 ऑक्टोबर (हिं.स.)।औरंगाबादपदवीधर मतदार यादीत 6 नोव्हेंबरपर्यंत नाव नोंदविता येणार आहे. भारत निवडणूक आयोग व राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या निर्देशानुसार ०५-औरंगाबाद विभागाकरीता पदवीधर मतदारसंघासाठी नव्याने मतदारयादी तयार करण्याचा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. यानुसार मतदारयादीत नाव समावेश करण्याची अंतिम मुदत ६ नोव्हेंबर २०२५ पर्यंत आहे.
पदवीधर मतदारसंघाची मतदारयादी प्रत्येक निवडणुकीपूर्वी नव्याने तयार केली जाते. त्यानुसार सर्व पदवीधारकांनी विहित नमुन्यात नव्याने अर्ज दाखल करणे आवश्यक आहे. या अनुषंगाने ०५-औरंगाबाद विभागाकरीता नव्याने तयार होणाऱ्या मतदारयादीत नाव समावेश करण्यासाठी लातूर तालुका हद्दीत सर्वसाधारण रहिवासी असलेल्या सर्व पदवीधारकांनी लातूर तहसील कार्यालय येथे नियुक्त पथकाकडे ६ नोव्हेंबर २०२५ पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन लातूर उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे व तहसीलदार सौदागर तांदळे यांनी दिले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis