रत्नागिरी : परचुरे स्मृतिप्रीतर्थ राज्य मानांकन कॅरम स्पर्धा
रत्नागिरी, 20 ऑक्टोबर, (हिं. स.) : कै. सौ. नीला व कै. मधुकाका परचुरे स्मृतिप्रीतर्थ परचुरे परिवार व गुहागरच्या कॅरमप्रेमी मित्र मंडळाने जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा आयोजित केली आहे. जिल्हा असोसिएशनच्या सहकार्याने व महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या मान्
रत्नागिरी : परचुरे स्मृतिप्रीतर्थ राज्य मानांकन कॅरम स्पर्धा


रत्नागिरी, 20 ऑक्टोबर, (हिं. स.) : कै. सौ. नीला व कै. मधुकाका परचुरे स्मृतिप्रीतर्थ परचुरे परिवार व गुहागरच्या कॅरमप्रेमी मित्र मंडळाने जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा आयोजित केली आहे.

जिल्हा असोसिएशनच्या सहकार्याने व महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने या वर्षातील दहावी महाराष्ट्र राज्य मानांकन कॅरम स्पर्धा गुहागर येथे कै. इंदिरा वासुदेव शेटे सभागृहात ८ ते १० नोव्हेंबर या कालावधीत पुरुष एकेरी व महिला एकेरी या गटात होणार आहे. स्पर्धेत विजेत्यांना एक लाखाची पारितोषिके देण्यात येणार आहेत.

स्पर्धेची पुरुष खुली व महिला एकेरीची प्रवेशिका रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनचे सेक्रेटरी मिलिंद साप्ते (९४२२४३३०५५) यांच्याकडे ३० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत स्पर्धा शुल्कासह द्यावी. त्यानंतर आलेल्या प्रवेशिकेचा विचार केला जाणार नाही. स्पर्धेचे शुल्क ७०० रुपये असून महाराष्ट्र राज्य नोंदणी शुल्क १०० रुपये आहे. प्रवेशिका देताना खेळाडूने आपले संपूर्ण नाव, मोबाइल क्रमांक, इमेल आयडी, जन्म तारीख देणे आवश्यक आहे. १८ वर्षांखालील मुले व मुली यांना या स्पर्धेत भाग घ्यायचा असल्यास त्यांना ३५० रुपये स्पर्धा शुल्क असेल. स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनचा लोगो असलेला सफेद टीशर्ट परिधान करणे आवश्यक आहे.

स्पर्धेत जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी भाग घ्यावा, असे आवाहन स्पर्धा आयोजक प्रदीप परचुरे परिवार व कॅरमप्रेमी मित्र मंडळ, जिल्हा कॅरम असोसिएशनचे सल्लागार सुचय अण्णा रेडीज, अध्यक्ष प्रदीप भाटकर, उपाध्यक्ष सुरेंद्र देसाई, खजिनदार नितीन लिमये, सेक्रेटरी मिलिंद साप्ते यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande