लातूर : आदिवासी गोंड समाजाच्या पालमध्ये दिवाळीनिमित्त किट वाटप
लातूर, 20 ऑक्टोबर (हिं.स.)। लातूर येथील बाभळगाव रोड येथे असलेल्या वैशाली नगरमध्ये राहत असलेल्या आदिवासी गोंड समाजाच्या पालमध्ये जाऊन दरवर्षी प्रमाणे याही वर्षी त्या समाजातील पालमध्ये राहत असलेल्या गोरगरीब लोकांना फराळ किट व प्रत्येक महिलेला एक साडी
अ


लातूर, 20 ऑक्टोबर (हिं.स.)। लातूर येथील बाभळगाव रोड येथे असलेल्या वैशाली नगरमध्ये राहत असलेल्या आदिवासी गोंड समाजाच्या पालमध्ये जाऊन दरवर्षी प्रमाणे याही वर्षी त्या समाजातील पालमध्ये राहत असलेल्या गोरगरीब लोकांना फराळ किट व प्रत्येक महिलेला एक साडी याप्रमाणे वाटप कार्यक्रम संपन्न झाला. आमदार विक्रम काळे यांच्या हस्ते या कीटचे वाटप करण्यात आले. मैत्री फाउंडेशनचा सामाजिक दीपोत्सव, लातूर वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आली होते.

मैत्री फाऊंडेशन सातत्याने सामाजिक उपक्रम राबवून समाजातील गोरगरीब पीडित लोकांना मदत करण्याची भूमिका घेत असते. याबद्दल त्याचे संयोजक संतोष बिराजदार होते. या कार्यक्रमासाठी मैत्री फाऊंडेशनचे रमेश बिराजदार, प्रा. शिवराज मोटेगावकर, तुकाराम पाटील, विवेक सौताडेकर, निलेश राजमाने, राजकुमार जाधव, रामप्रकाश झुरुळे आदी मान्यवर सहकारी व आदिवासी गोंड समाजातील सर्व नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande