दिवाळीसाठी जळगावमार्गे आणखी दोन एक्स्प्रेस धावणार
जळगाव, 20 ऑक्टोबर (हिं.स.) | दिवाळी, छटपूजेसाठी रेल्वे प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन रेल्वेनं जळगाव-भुसावळमार्गे आणखी दोन रेल्वे गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. उधना-भागलपूर-उधना आणि मालदा-उधना-मालदा या दोन गाड्या सुरु होणार आहे. विशेष या गाड
दिवाळीसाठी जळगावमार्गे आणखी दोन एक्स्प्रेस धावणार


जळगाव, 20 ऑक्टोबर (हिं.स.) | दिवाळी, छटपूजेसाठी रेल्वे प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन रेल्वेनं जळगाव-भुसावळमार्गे आणखी दोन रेल्वे गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. उधना-भागलपूर-उधना आणि मालदा-उधना-मालदा या दोन गाड्या सुरु होणार आहे.

विशेष या गाड्यांमुळे जिल्ह्यातील प्रवाशांना दिलासा मिळाला.०९०८१ उधना-भागलपूर अनारक्षित विशेष रेल्वे २७ ऑक्टोबरपर्यंत घावणार आहे. ही रेल्वे दररोज सकाळी ११:१५ वाजता उघना येथून निघेल आणि दुपारी ३.५५ वाजता जळगावात थांबा घेऊन भागलपूरसाठी रवाना होईल. त्याच वेळी, ०९०८२ भागलपूर-उधना अनारक्षित विशेष रेल्वे २८ ऑक्टोबरपर्यंत रोज सकाळी १०. ५० वाजता भागलपूरहून निघेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजता उधना येथे पोहोचेल.०३४१७ मालदा उघना विशेष ही मालदा येथून दुपारी १२.२० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी ६.५५ वाजता भुसावळात थांबा घेईल. २५ ऑक्टोबर तसेच १ आणि ८ नोव्हेंबर रोजी धावणार आहे. तर ०३४१८ उधना-मालदा विशेष गाडी सोमवारी उधना येथून दुपारी १२.२० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी ६.५५ वाजता भुसावळात थांबा घेईल. ही रेल्वे २१ आणि २८ ऑक्टोबर, ४ व ११ नोव्हेंबर रोजी धावणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande