लातूर, 20 ऑक्टोबर (हिं.स.)। कर्मचाऱ्यांनी सुरक्षिततेसाठी आवश्यक साधनांचा वापर करावा,पीपीई किट वापरावे. पुरुष कामगारांनी पायांना इजा होऊ नये यासाठी मोठे बूट वापरावेत, अशा सूचनाही जिल्हाधिकारी वर्षा घुगे यांनीकेल्या. यावेळी त्या महिला कर्मचाऱ्यांशी संवाद साधला आणि सर्व कामगारांना त्यांनी दीपावली निमित्त शुभेच्छा दिल्या. तेव्हा काही महिला कामगारांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. आपल्या कामाचे स्वरूप जिल्हाधिकारी व आयुक्तांना सांगितले.
लातूर शहर महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागात घनकचरा व्यवस्थापनाचे काम करणाऱ्या महिलांना दीपावली निमित्त जिल्हाधिकारी वर्षा घुगे व आयुक्त मानसी यांच्या हस्ते फराळाचे वाटप करण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त देविदास जाधव, उपायुक्त डॉ.पंजाब खानसोळे, मुख्य लेखाधिकारी रावसाहेब कोलगणे, मुख्य स्वच्छता अधिकारी कलीम शेख, मुख्य स्वच्छता निरीक्षक रवी कांबळे,डी.एस. सोनवणे ळ,शिवराज शिंदे, अक्रम शेख यांच्यासह स्वच्छता निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis