लातूर मनपाने सुरु केली स्मार्ट कर संकलन प्रणाली
लातूर, 20 ऑक्टोबर (हिं.स.)। लातूर महानगरपालिका कर आकारणी व कर संकलन विभागाने यंदा १०० कोटींच्या मालमत्ता करवसुलीचे लक्ष्य निश्चित केले असून त्याच्या पूर्ततेसाठी प्रशासनाकडून वेगवेगळे उपाय केले जात आहे. दि.१० नोव्हेंबर पर्यंत ८० टक्के शास्ती सूट लाग
अ


लातूर, 20 ऑक्टोबर (हिं.स.)। लातूर महानगरपालिका कर आकारणी व कर संकलन विभागाने यंदा १०० कोटींच्या मालमत्ता करवसुलीचे लक्ष्य निश्चित केले असून त्याच्या पूर्ततेसाठी प्रशासनाकडून वेगवेगळे उपाय केले जात आहे. दि.१० नोव्हेंबर पर्यंत ८० टक्के शास्ती सूट लागू असून थकीत टॅक्स भरणा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मालमत्ता करातील सामान्य करावर विविध सवलत देऊन पालिकेने सप्टेंबर अखेरपर्यंत ३५ कोटींची वसुली केली आहे. करदात्याच्या दारी जाऊन कर वसूल करण्याच्या दृष्टिकोनातून स्मार्ट कर संकलन प्रणाली ही ''मोबाइल व्हॅन'' सेवा सुरू करण्यात आली आहे.

आयुक्त तथा प्रशासक मानसी व उपायुक्त (कर संकलन) डॉ पंजाब खानसोळे यांच्या संकल्पनेतून ही व्हॅन कार्यान्वित करण्यात आली आहे. मालमत्ता कर शास्ती सूट योजना प्रसिद्धी व प्रचार करणारी ही व्हॅन शहरात दाखल झाली आहे. आज या व्हॅन चे उद्घाटन जिल्हा प्रशासन अधिकारी (नगर पालिका) लातूर श्री अजित डोके व उपायुक्त डॉ पंजाब खानसोळे यांच्या हस्ते करण्यात आले आहे. यावेळी कर अधीक्षक प्रतिक मुसांडे, भांडारपाल बालाजी शिंदे , क्षेत्रीय अधिकारी बंडु किसवे,संतोष लाडलपुरे यांची उपस्थिती होती .

सदरील व्हॅन मुळे नागरिकांना सध्या सुरू असलेल्या ८० टक्के शास्ती माफी योजनेची माहिती मिळण्यास मदत होणार आहे . तसेच शहरातील करदात्यांना आपल्या दारातच कर भरणे सोयीचे होणार आहे.करदात्यांकडूनही या सुविधेस चांगला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा उपायुक्त डॉ खानसोळे यांनी यावेळी व्यक्त केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande