लातूर, 20 ऑक्टोबर (हिं.स.)। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी उदगीर विधानसभा मतदारसंघातील मतदारांशी संवाद साधण्याचे मार्गदर्शन, प्रचार-प्रसाराचे नियोजन आणि कार्यकर्त्यांच्या जबाबदाऱ्यांवर एका बैठकीत विशेष भर देण्यात आला. आमदार संजय बनसोडे यांच्या उपस्थितीत या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
बैठकीत उपस्थित मान्यवरांनी आपले विचार मांडले आणि प्रत्येक शहरी व ग्रामीण भागात जाऊन नागरिकांपर्यंत संदेश पोहोचवण्याच्या दृष्टीने आगामी मोहिमेसाठी रणनीती ठरवली.
उदगीर येथील शासकीय विश्रामगृहात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्णाकृती पुतळा अनावरण सोहळा व विविध विकास कामांचे लोकार्पण तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक 2025 यासंदर्भातील पूर्व तयारी बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या बैठकीला उपस्थित राहून सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी आवश्यक ते सर्व व्यवस्थापन, पुतळ्याच्या अनावरणासाठी लागणारी तयारी, कार्यक्रमाचे वेळापत्रक आणि सुरक्षा व्यवस्थेवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
----------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis