लातूर, 20 ऑक्टोबर (हिं.स.)।अहमदपूर येथील सिद्धी शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज लिमिटेड उजना ऊस विकास परिषद संपन्न झाली यावेळी राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची प्रामुख्याने उपस्थिती होती अहमदपूर येथे सिद्धी शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज लिमिटेडच्या ऊस विकास परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.या ऊस विकास परिषदेला उपस्थित राहून सहकार मंत्री पाटील यांनी शेतकरी बांधवांशी व कारखान्यातील कर्मचाऱ्यांशी परिषदेच्या माध्यमातून संवाद साधला.
कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत प्रगती केली पाहिजे. हे यावेळी अधोरेखित केले. ऊस विकास परिषदेमधून शेतकऱ्यांना आधुनिक शेतीतंत्रज्ञान, ठिबक सिंचन, गुणवत्तापूर्ण वाण, तसेच इथेनॉल व वीज निर्मिती अशा उपक्रमांची माहिती दिली जाते त्यामुळे शेतकरी बंधूंना या ऊस विकास परिषदेतून शेती विषयक आधुनिक माहिती मिळेल.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष होते श्री बाळासाहेब जाधव , प्रमुख पाहुणे नॅचरल शुगरचे अध्यक्ष.श्री बी बी ठोंबरे, वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ डॉक्टर बाळकृष्ण जगदग्री, एआय तंत्रज्ञांचे मार्गदर्शक अरुण पडोळे, बी एस आय चे व्यवस्थापकीय संचालक अजित चौगुले, कोल्हापूरचे बीएच पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग आढाव, तसेच शेतकरी बांधव, कारखान्याचे कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
-----------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis