रत्नागिरी : जनसेवा ग्रंथालयातर्फे शनिवारी कवितासंग्रहाचे प्रकाशन
रत्नागिरी, 20 ऑक्टोबर, (हिं. स.) : वाचन आणि साहित्य चळवळ वृद्धिंगत व्हावी, यासाठी कटिबद्ध असलेल्या येथील जनसेवा ग्रंथालयातर्फे येत्या शनिवारी, दि. 25 ऑक्टोबर रोजी कवितासंग्रहाचे प्रकाशन होणार आहे. रत्नागिरीतील कवी, गझलकार विजयानंद जोशी यांच्या ‘थो
रत्नागिरी : जनसेवा ग्रंथालयातर्फे शनिवारी कवितासंग्रहाचे प्रकाशन


रत्नागिरी, 20 ऑक्टोबर, (हिं. स.) : वाचन आणि साहित्य चळवळ वृद्धिंगत व्हावी, यासाठी कटिबद्ध असलेल्या येथील जनसेवा ग्रंथालयातर्फे येत्या शनिवारी, दि. 25 ऑक्टोबर रोजी कवितासंग्रहाचे प्रकाशन होणार आहे.

रत्नागिरीतील कवी, गझलकार विजयानंद जोशी यांच्या ‘थोडं कळत थोडं नकळत’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन आणि काव्यसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. रत्नागिरीतील राणी लक्ष्मीबाई सभागृहात सायंकाळी ४ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. काव्यसंग्रहाचे प्रकाशन ज्येष्ठ पत्रकार प्रमोद कोनकर यांच्या हस्ते होणार असून त्यानंतर निमंत्रित कवींचे काव्यसंमेलन होणार आहे. त्यामध्ये संजय कुळ्ये, शुभम कदम, नितीन देशमुख, अर्चना देवधर, अरुण मौर्य आणि विजयानंद जोशी सहभागी होणार आहेत.या समारंभाला आणि काव्यसंमेलनाला साहित्यप्रेमी, काव्यरसिक, वाचक, सभासदांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जनसेवा ग्रंथालयातर्फे करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande