अकोल्यात वंचितला धक्का, बोर्डे यांचा भाजपमध्ये प्रवेश
अकोला, 22 ऑक्टोबर (हिं.स.)। आगामी महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती , नगरपंचायत, नगरपालिका निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी महायुती यश मिळणारच तसेच जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी ट्रिपल इंजिनचे सरकार आणण्यासाठी दिवाळीच्या गोवर्धन पूजेच्या द
प


अकोला, 22 ऑक्टोबर (हिं.स.)। आगामी महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती , नगरपंचायत, नगरपालिका निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी महायुती यश मिळणारच तसेच जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी ट्रिपल इंजिनचे सरकार आणण्यासाठी दिवाळीच्या गोवर्धन पूजेच्या दिवशी वंचितचे सुशांत बोर्डे आपल्या सहकार्यासह भाजपामध्ये प्रवेश ही विजयाची नांदी असल्याचे प्रतिपादन भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी आज केले.

भारतीय जनता पक्ष कार्यकर्त्यांचा आणि सामूहिक निर्णय घेणारा पक्ष असून विचारांसोबत विकासाचा संकल्प घेऊन कार्यरत असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, अनुप धोत्रे, आमदार सावरकर, पालकमंत्री आकाश फुंडकर, आमदार हरीश पिंपळे आमदार प्रकाश भारसाकले, आमदार वसंत खंडेलवाल, संतोष शिवरकर, जयंत मसने, विजय अग्रवाल यांच्या नेतृत्वावर विश्वास करून आपण भाजपामध्ये प्रवेश करत असून सामाजिक व विकासाचा संकल्प लक्षात घेऊन आपण जनतेच्या समस्या निराकरणासाठी कटिबद्ध राहू अशा शब्दात भाजपाच्या प्रवेशाचा आपण कार्यकर्त्यांची विचार करून निर्णय घेतल्याची प्रतिपादन माजी जिल्हा परिषद सदस्य सुशांत बोर्डे यांनी केले.

भारतीय जनता पक्ष कार्यालयात संतोष शिवरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेमध्ये भाजप बहुजन महासंघातून माजी जिल्हा परिषद सदस्य सुशांत साहेबराव बोर्डे, सदानंद बोर्डे, विजय देशमुख, सचिन बडोदे, बाळासाहेब बडे, मंगेश मोरे, दयाराम बोर्डे, विलास गावंडे, अनंत बोर्डे, बाबाराव गावंडे, प्रशांत काकडे यांच्या नेतृत्वाखाली असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला त्यांचं स्वागत करण्यात आले.

भारतीय जनता पक्ष आज सर्वसामान्यांचा पक्ष असून आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये भाजपा विजय होणार व तिबल इंजन म्हणून सरकार आणण्यासाठी कार्यकर्ते प्रवेश करत असून अनेक पक्षातील कार्यकर्ते भाजपामध्ये प्रवेशाची इच्छुक असून कोर कमिटीच्या विचारानंतर अनेक पक्षातील कार्यकर्त्यांना भाजपामध्ये प्रवेश घेण्यात येईल अशी घोषणा खासदार अनुप धोत्रे यांनी केली ‌

कार्यक्रमाचे संचालन गिरीश जोशी तर आभार प्रदर्शन जयकुमार ठोकळ यांनी केले.

आमदार रणधीर सावरकर यांनी सर्जिकल स्ट्राइक करून जिल्ह्यातील अनेक लोकांचे प्रवेश घेण्याच्या दृष्टीने व आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये भाजपा महायुतीला विजय प्राप्त करून देण्याच्या दृष्टीने आखणी सुरू केली असून आणि दिवाळीच्या पर्वावर त्यांनी आज सुरुवात करून यशाचा शंख नाद ला सुरुवात केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande