परभणी, 22 ऑक्टोबर (हिं.स.) : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणामध्ये पक्षप्रवेश परभणी जिल्ह्यामध्ये होत आहेत विविध पक्षातील कार्यकर्ते नेते पदाधिकारी इतर पक्षात प्रवेश करीत आहेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या निमित्ताने आपापल्या मतदारसंघात आरक्षण झाल्यानंतर विविध पक्षांचा सहारा घेणे सुरू झाले आहे याचाच एक भाग म्हणून मानवत शहरातील विविध पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे पक्षांमध्ये प्रवेश केला असल्याची माहिती शिवसेना अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेशाध्यक्ष सईद खान यांनी आज प्रसारमाध्यमांना दिली आहे. मानवत शहरातील विविध पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी पाथरी मतदारसंघा मधे होत असलेल्या विकास कामे व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आज शिवसेनेत पक्षप्रवेश झाला असल्याचे त्यांनी सांगितले यामध्ये नयुंम जहागीर शेख,कलाम भाई,रौफ अन्सारी,जीलानी शाह,कलीम शेख,सर्फराज शेख,वाजीद शाह,मुश्ताक अन्सारी,पाशा पठाण,मेहबूब शेख,मुजीब शेख, कार्यकर्त्याचा पक्ष प्रवेश झाला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis