परभणी, 22 ऑक्टोबर (हिं.स.) : पाथरी येथील शिवप्रेमी नागरिकांचे आणि शिवसैनिकांचे हे अनेक वर्षांचे स्वप्न आता काही दिवसातच प्रत्यक्षात पुर्ण होणार आहे. या ऐतिहासिक कार्याची कामे आता पुर्ण झाली आहेत. हे केवळ एक स्थापत्य नव्हे, तर शौर्य, स्वाभिमान आणि स्वराज्याच्या मूल्यांचे प्रतीक असलेला स्मारक आहे. असे शिवसेना अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेशाध्यक्ष सईद खान यांनी आज सांगितले
पाथरी शहरातील सेलू कॉर्नर येथे प्रस्तावित छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य अश्वरूढ पुतळ्याच्या चबुतऱ्याच्या कामाची आज प्रत्यक्ष पाहणी खान यांनी केली.छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या जनतेसाठी प्रेरणास्त्रोत असून, त्यांच्या अश्वरूढ पुतळ्याच्या उभारणीसाठी सर्व प्रकारची अडचण दूर केल्या व अधिक सक्षमपणे पुढे नेण्याचे काम केले. यावेळी संबंधित अभियंते, ठेकेदार आणि कर्मचाऱ्यांशी चर्चा करून कामाचे बारकाईने त्यांनी निरीक्षण केले.ही पुतळा उभारणी ही फक्त एक वास्तू नाही, तर पाथरीच्या भूमीला मिळणारा इतिहासाचा आणि प्रेरणेचा अमूल्य ठेवा आहे. शिवकार्यासाठी मी कुठलीही जबाबदारी घ्यायला, कुठल्याही अडथळ्याला सामोरे जायला कायम तयार आहे असे ते म्हणाले. आपल्या सर्वांच्या एकजुटीने, प्रेरणेने आणि प्रेमाने हा पुतळा लवकरच पूर्ण होईल, ही खात्री आहे. शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी त्यांचे तेज पुन्हा अनुभवेल, यासाठी हा माझा संकल्प आहे काही उल्लेख खान यांनी केला
------------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis