द. आफ्रिकेने १८ वर्षांनंतर पाकिस्तानमध्ये पहिला कसोटी सामना जिंकला
इस्लामाबाद, २३ ऑक्टोबर, (हिं.स.). रावळपिंडी कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानचा ८ विकेट्सने पराभव करून दोन सामन्यांची मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. फिरकी जोडी केशव महाराज आणि सायमन हार्मर यांनी शानदार गोलंदाजी संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण भू
पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका कसोटी मालिका 1-1 ने बरोबरीत


इस्लामाबाद, २३ ऑक्टोबर, (हिं.स.). रावळपिंडी कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानचा ८ विकेट्सने पराभव करून दोन सामन्यांची मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. फिरकी जोडी केशव महाराज आणि सायमन हार्मर यांनी शानदार गोलंदाजी संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. महाराजने सामन्यात एकूण ९ विकेट्स (९/१३६) घेतल्या. तर हार्मरने ८ विकेट्स (८/१२५) घेतल्या. ६८ धावांच्या छोट्या लक्ष्याचा पाठलाग करताना, एडेन मार्कराम आणि रायन रिकेलटन यांनी संघाला सहज विजय मिळवून दिला. पाकिस्तानने पहिल्या डावात ३३३ धावा केल्या होत्याय याला उत्तर देताना दक्षिण आफ्रिकेने आपल्या पहिल्या डावात ४०४ धावा केल्या आणि ७१ धावांची आघाडी घेतली.

चौथ्या दिवसाच्या सुरुवातीला पाकिस्तानची धावसंख्या ९४/४ होती. बाबर आझम ४९ धावांवर क्रीजवर होता. त्याने अर्धशतक पूर्ण केले. पण काही चेंडूंनंतरच सायमन हार्मरने त्याला एलबीडब्ल्यू दिले आणि यजमानांना मोठा धक्का बसला. त्यानंतर पाकिस्तानचा डाव कोसळला. मोहम्मद रिझवान शॉर्ट लेगवर झेलबाद झाला आणि हार्मरला डावातील पाचवी विकेट मिळाली. त्यानंतर काही वेळातच नोमान अलीला बाद करत हार्मरने आपली १००० वी प्रथम श्रेणी विकेट मिळाली. शाहीन आफ्रिदी सलग तिसऱ्यांदा शून्यावर धावबाद झाला. सलमान अली आघाने स्वीप आणि रिव्हर्स स्वीपसह दोन चौकार मारले. पण तो देखील केशव महाराजांनी बोल्ड केला. त्यानंतर महाराजांनी साजिद खानला यष्टीचीत केले आणि पाकिस्तानचा डाव १३८ धावांवर आटोपला.

मार्कराम आणि रिकल्टनने संघाला सहज विजय मिळवून दिला. लक्ष्याचा पाठलाग करताना एडन मार्करामने दमदार फलंदाजी केली. मार्कराम ४२ धावांवर एलबीडब्ल्यू झाला, तर ट्रिस्टन स्टब्स स्लिपमध्ये झेलबाद झाला. शेवटी, रायन रिकेल्टन (२५)* ने सलग षटकार मारून सामना संपवला आणि दक्षिण आफ्रिकेला संस्मरणीय विजय मिळवून दिला.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande