
नवी दिल्ली, 27 ऑक्टोबर (हिं.स.) - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशभरातील नागरिकांना सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त 31 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या 'रन फॉर युनिटी'मध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. हा कार्यक्रम राष्ट्रीय एकता दिवसाचे प्रतीक आहे आणि सरदार पटेल यांनी भारतासाठी कल्पना केलेल्या एकतेच्या चिरस्थायी भावनेचा उत्सव साजरा करतो.
‘एकता दिवस भारत’ने एक्स वर केलेल्या पोस्टला उत्तर देताना मोदी यांनी लिहिले आहे की : “31 ऑक्टोबर रोजी एकता दौडमध्ये सामील व्हा आणि एकतेची भावना साजरी करा! चला सरदार पटेल यांच्या अखंड भारताच्या दृष्टिकोनाचा सन्मान करूया.”
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी