एनएसआयसीने भारत सरकारला 43.89 कोटींचा लाभांश केला अदा
नवी दिल्‍ली, 28 ऑक्टोबर (हिं.स.)। राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळ(एनएसआयसी) या केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या (एमएसएमई) अखत्यारीतील मिनिरत्न श्रेणीच्या उद्योगाने भारत सरकारला आर्थिक वर्ष 2024-25 साठीचा 43.89 कोटी रुपयांचा लाभांश
NSIC pays dividend


नवी दिल्‍ली, 28 ऑक्टोबर (हिं.स.)। राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळ(एनएसआयसी) या केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या (एमएसएमई) अखत्यारीतील मिनिरत्न श्रेणीच्या उद्योगाने भारत सरकारला आर्थिक वर्ष 2024-25 साठीचा 43.89 कोटी रुपयांचा लाभांश अदा केला.

एनएसआयसीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ.शुभ्रांषु शेखर आचार्य यांनी केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री जितन राम मांझी, केंद्रीय एमएसएमई राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांच्याकडे लाभांशाचा चेक सुपूर्द केला. यावेळी केंद्रीय एमएसएमई सचिव एस.सी.एल. दास तसेच मंत्रालयातील आणि एनएसआयसीमधील ज्येष्ठ अधिकारी उपस्थिती होते.

या प्रसंगी बोलताना डॉ. आचार्य यांनी एनएसआयसीने गाठलेले अनेक महत्त्वाचे आर्थिक टप्पे अधोरेखित केले. महामंडळाने मिळवलेला 3,431 कोटी रुपयांचा महसूल तसेच आदल्या वर्षाच्या करपश्चात नफ्यामध्ये (पीएटी) 15.60टक्क्यांची वाढ नोंदवत यावर्षी झालेला 146.30 कोटी रुपयांचा करपश्चात नफा यांची माहिती त्यांनी उपस्थितांना दिली. एकात्मिक मदत सेवांच्या माध्यमातून एमएसएमई उद्योगांना सक्षम करण्याच्या एनएसआयसीच्या प्रयत्नांची केंद्रीय मंत्र्यांनी प्रशंसा केली. उद्योग निर्मिती आणि कौशल्य विकासाला चालना देण्यात एनएसआयसीच्या सातत्यपूर्ण भूमिकेवर दोन्ही नेत्यांनी विश्वास व्यक्त केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande