वल्लभभाई पटेल यांची १५० वी जयंती विशेष स्वरुपात साजरी होणार
भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी ३१ ऑक्टोबर ‘राष्ट्रीय एकता दिवस’ म्हणून साजरा केला जातो. या वर्षी त्यांच्या १५० व्या जयंतीच्या निमित्ताने हा दिवस भव्य स्वरूपात साजरा केला जाणार आहे. हा दिवस भारताच्या एकता, अखंडता आ
सरदार


भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी ३१ ऑक्टोबर ‘राष्ट्रीय एकता दिवस’ म्हणून साजरा केला जातो. या वर्षी त्यांच्या १५० व्या जयंतीच्या निमित्ताने हा दिवस भव्य स्वरूपात साजरा केला जाणार आहे. हा दिवस भारताच्या एकता, अखंडता आणि राष्ट्रीय एकजुटतेचे प्रतीक असून, ५६२ संस्थान एकत्रित येऊन आधुनिक भारताची पायाभरणी करणाऱ्या सरदार पटेलांच्या अद्वितीय कार्याला अभिवादन करणार आहे.

एकतानगर येथे भव्य परेड आणि सांस्कृतिक कार्यक्रम

या वर्षीचा उत्सव नैसर्गिक सौंदर्य आणि सांस्कृतिक समृद्धीचा संगम असणाऱ्या गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यातील एकतानगर येथे आयोजित केला जाणार आहे. हे ठिकाण “विविधतेत एकता” या भारताच्या संकल्पनेचे प्रतीक म्हणून निवडले गेले आहे. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे केंद्रीय सशस्त्र पोलीस दल राज्य पोलीस दल आणि राष्ट्रीय कॅडेट कोर यांच्या सहभागाने भव्य परेड आणि सांस्कृतिक उत्सव आयोजित करण्यातआलाआहे.

राष्ट्रीय कॅडेट्स कोर आणि शालेय बँड यांचेसादरीकरण

या परेडमध्ये सीमा सुरक्षा बल, केंद्रीय राखीव पोलीस दल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल, भारत-तिबेट सीमा पोलीस, सशस्त्र सीमा बल तसेच आसाम, त्रिपुरा, ओडिशा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, पंजाब, जम्मू आणि काश्मीर, केरळ आणि आंध्र प्रदेश या राज्यांच्या पोलीस दलांचा सहभाग असेल.घोडदळ आणि उंटदळाचे संच, स्वदेशी जातींच्या श्वानांचे कौशल्यप्रदर्शन, मार्शल आर्ट सादरीकरणे आणि शस्त्रविरहित युद्धकौशल्याची प्रात्यक्षिके या परेडची शोभा वाढवतील.

महिला सक्षमीकरणावर विशेष भर देत, प्रधानमंत्रीयांना दिल्या जाणाऱ्या गार्ड ऑफ ऑनरचे नेतृत्व एक महिला अधिकारी करतील. केंद्रीय औद्योगिक सुरक्षाबल आणि केंद्रीय राखीव बलातील महिला कर्मचाऱ्यांकडून मार्शल आर्ट आणि युद्धकौशल्याचे प्रभावी प्रदर्शन सादर केले जाईल. याद्वारे त्यांचे शौर्य, शिस्त आणि आत्मविश्वास प्रकट होईल. राष्ट्रीय सुरक्षेत विशेष योगदान दिले आहे असे रामपूर हाउंड आणि मुधोल हाउंड हे स्वदेशी श्वान आपली कौशल्ये सादर करतील. विशेष म्हणजे, अखिल भारतीय पोलीस श्वान स्पर्धेत विजेती ठरलेली ‘मुधोल हाउंड रिया’या वर्षीच्या परेडमध्ये डॉग स्क्वाडचे नेतृत्व करेल. याशिवाय, गुजरात पोलिसांचे घोडदळ, आसाम पोलिसांचा मोटरसायकल डेअरडेव्हिल शो, सीमासुरक्षाबलचे उंटदळ आणि उंट बँड, तसेच एनसीसी कॅडेट्स आणि शालेय बँड “एकतेतच शक्ती आहे” हा संदेश देत परेडमध्ये सहभाग घेतील.भारतीय वायुदलाच्या सूर्यकिरण पथकाकडून सादर होणारा भव्य एअर शो या परेडच्या भव्यतेत आणखी भर घालेल.

“विविधतेत एकता” संदेशदेणारेसंचलन

राष्ट्रीय एकता दिनी परेडमध्ये विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांचे संचालन ‘विविधतेत एकता’या विषयाचे दर्शन घडवतील.

या संचालनात राष्ट्रीय सुरक्षा गार्ड, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, गुजरात, जम्मू आणि काश्मीर, अंदमान-निकोबार बेटे, मणिपूर, महाराष्ट्र, छत्तीसगड, उत्तराखंड आणि पुद्दुचेरी यांच्या संचालनाचा समावेश असेल.

यासह सीमासुरक्षाबल, केंद्रीयराखीवपोलीसदल, केंद्रीयऔद्योगिकसुरक्षाबल, सशस्त्रसीमाबल, दिल्ली पोलीस आणि विविध राज्य पोलीस दलांचे ब्रास बँड कार्यक्रमाच्या उत्सवी वातावरणात अधिक रंग भरतील.

या परेडमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाचे पाच शौर्यचक्र विजेते आणि सीमासुरक्षाबलचे १६ वीरता पदक विजेते सन्मानित केले जातील. या शूर जवानांनी नक्षलविरोधी आणि दहशतवादविरोधी मोहिमांमध्ये, तसेच पश्चिम सीमेवरील ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान, अद्वितीय धैर्य आणि पराक्रमाचे प्रदर्शन घडविले आहे. परेडसोबतच भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाद्वारे आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात ९०० कलाकार भारतीय शास्त्रीय नृत्यांचे सादरीकरण करतील, ज्यातून भारताची समृद्ध सांस्कृतिक परंपरा आणि विविधतेतील सौंदर्य अधोरेखित होईल.

राष्ट्रीय एकता दिनाचे उद्दिष्ट नागरिकांमध्ये राष्ट्रीय एकता, सौहार्द आणि देशभक्तीची भावना दृढ करणे हे आहे. हा उत्सव प्रत्येक भारतीयाला या मूल्यांचा स्वीकार करण्यासाठी आणि देशाच्या ऐक्याच्या भावनेला बळ देण्यासाठी प्रेरित करतो. १ ते १५ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत एकतानगर येथे ‘भारत पर्व’ आयोजित करण्यात येईल. या पर्वात संपूर्ण भारतातील सांस्कृतिक सादरीकरणे आणि खाद्य महोत्सव आयोजित केला जाईल, ज्यामध्ये देशाच्या विविध परंपरांचा संगम पाहायला मिळेल. या पर्वाचा समारोप १५ नोव्हेंबर रोजी भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करून केला जाईल.

– वर्षाफडके–आंधळे

उपसंचालक (वृत्त)

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande