रशिया-युक्रेन युद्धात मृत्यू झालेल्या हरियाणातील तरुणाचा पार्थिव घरी पोहचण्याची शक्यता
चंडीगढ़, 29 ऑक्टोबर (हिं.स.) हरियाणाच्या हिसार जिल्ह्यातील एका तरुणाचा रशिया–युक्रेन युद्धात मृत्यू झाला आहे आणि त्याचे पार्थिव हिसारला आणले जाण्याची शक्यता आहे. मृत तरुणाची ओळख मदनहेडी गावातील 28 वर्षीय सोनू अशी झाली आहे. सोनूच्या मोठ्या भावाने,
रशिया-युक्रेन युद्धात मृत्यू झालेल्या हरियाणातील तरुणाचा पार्थिव आज घरी पोहचण्याची शक्यता


चंडीगढ़, 29 ऑक्टोबर (हिं.स.) हरियाणाच्या हिसार जिल्ह्यातील एका तरुणाचा रशिया–युक्रेन युद्धात मृत्यू झाला आहे आणि त्याचे पार्थिव हिसारला आणले जाण्याची शक्यता आहे. मृत तरुणाची ओळख मदनहेडी गावातील 28 वर्षीय सोनू अशी झाली आहे.

सोनूच्या मोठ्या भावाने, अनिलने, सांगितले की सोनूला जबरदस्तीने रशियन आर्मीमध्ये भरती करून युद्धात पाठवण्यात आले होते. रशियन सैन्याच्या कमांडरने अनिलला फोन करून माहिती दिली की युक्रेनच्या ड्रोन हल्ल्यात सोनूचा मृत्यू झाला आहे. सोनूचे पार्थिव आज (बुधवारी) एअरलिफ्ट करून भारतात आणले जाण्याची शक्यता आहे.

अनिलने सांगितले की सोनू आणि गावातीलच २४ वर्षीय अमन मे २०२४ मध्ये रशियाला गेले होते. तेथे ते ‘फॉरेन लँग्वेज कोर्स’ करण्याच्या उद्देशाने गेले होते. साधारणपणे भारतातील युवक रशिया आणि जुन्या USSR गणराज्यांमध्ये अभ्यास किंवा कोर्सच्या बहाण्याने जातात आणि तेथे सहज नोकरी मिळते.

सोनूने ३ सप्टेंबरला शेवटचा फोन केला होता, त्यावेळी त्याने सांगितले की त्याला जबरदस्तीने रशियन सैन्यात भरती केले जात आहे आणि लवकरच युद्धभूमीवर पाठवले जाईल. त्यानंतर १९ सप्टेंबरला रशियाकडून एक पत्र आले, ज्यात सांगितले गेले की तो ६ सप्टेंबरपासून बेपत्ता आहे आणि आता त्याचे पार्थिव सापडले आहे. मात्र कुटुंबाचे म्हणणे आहे की रशियन सैन्याने दाखवलेले शव सोनूचे नाही.

अनिलच्या मते, ६ ऑक्टोबरला रशियन सैन्याच्या एका अधिकाऱ्याने पुन्हा पत्र पाठवून कुटुंबाला कळवले की सोनूचा युद्धात मृत्यू झाला आहे. तथापि, सुरुवातीला रशियातील भारतीय दूतावासाने याची पुष्टी केली नव्हती. नंतर कुटुंबाने दूतावासाशी संपर्क साधला असता, त्यांना सांगण्यात आले की मृत्यूची माहिती खरी आहे आणि बुधवारी पार्थिव भारतात आणले जाईल. अनिलने सांगितले की रशियन आर्मीने सोनूच्या शवाचा फोटो पाठवला आहे, पण तो ओळखता येत नाही, कारण शरीर पूर्णपणे क्षत-विक्षत अवस्थेत आहे आणि शवावर बर्फासारखे पांढरे काहीतरी जमा झालेले आहे.

अलीकडेच भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने २७ भारतीय तरुणांची यादी जारी केली होती, ज्यांच्या रशियन आर्मीमध्ये भरती झाल्याची पुष्टी झाली होती. त्यामध्ये हरियाणातील ७ युवक होते, यामध्ये फतेहाबाद, हिसार आणि कैथल येथील प्रत्येकी दोन आणि कलानौर येथील एक युवकांचा समावेश आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande