आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती घटल्या
पेट्रोल-डिझेल स्वस्त होण्याची शक्यता मुंबई, 3 ऑक्टोबर (हिं.स.)। वाहनधारकांसाठी खुशखबर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती घटल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कमी होण्याची शक्यता आहे. सध्या कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल ६४ डॉलर्सवर आले आहे
Crude oil international market


पेट्रोल-डिझेल स्वस्त होण्याची शक्यता

मुंबई, 3 ऑक्टोबर (हिं.स.)। वाहनधारकांसाठी खुशखबर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती घटल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कमी होण्याची शक्यता आहे. सध्या कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल ६४ डॉलर्सवर आले आहेत. ही पातळी मागील १६ आठवड्यांमध्ये पहिल्यांदा इतकी कमी झाली आहे.

कच्च्या तेलाच्या किंमती कमी होण्यामागे अमेरिकेत सरकारी कामकाज ठप्प असणे आणि टॅरिफ लागू होणे मुख्य कारणे आहेत. याशिवाय, भारत रशियाकडून स्वस्तात तेल खरेदी करत आहे. सप्टेंबर महिन्यात भारताने रशियाकडून 6.05 लाख bpd तेल आयात केले, जे ऑगस्टच्या तुलनेत ३२ टक्के कमी आहे.

मागील वर्षी ७ ऑक्टोबरला कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल ८१ डॉलर होते. यानंतर या दरात मोठी घट झाली आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरावर कच्च्या तेलाचे दर थेट प्रभाव टाकतात, त्यामुळे येत्या काही दिवसांत इंधन स्वस्त होण्याची शक्यता आहे.

पेट्रोल-डिझेलचा दर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार होत असतात आणि त्यानुसार पेट्रोल व डिझेलचे दर बदलत राहतात. पेट्रोल-डिझेलच्या किमती व्हॅट, मालवाहतूक शुल्क, स्थानिक कर इत्यादी घटकांवर अवलंबून असते.

एसएमएसद्वारे जाणून घ्या दर :

देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या नवीन किमती जाहीर करण्यात आल्या आहेत. कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतींनुसार भारतात इंधनाची किंमत ठरवली जाते. तर तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर एसएमएसद्वारे देखील जणून घेऊ शकता. यासाठी तुम्ही इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकतो.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande