अकोला : पीक विमा तक्रारींबाबत ‘एसएओं’ने दिले स्पष्टीकरण
अकोला, 31 ऑक्टोबर (हिं.स.)। शेतकऱ्यांना पिक विम्याची रक्कम कमी मिळण्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्याबाबत जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. पीक विम्याची रक्कम कमी मिळाल्याच्या तक्रारींची चौकशी केली असता काही
अकोला : पीक विमा तक्रारींबाबत ‘एसएओं’ने दिले स्पष्टीकरण


अकोला, 31 ऑक्टोबर (हिं.स.)। शेतकऱ्यांना पिक विम्याची रक्कम कमी मिळण्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्याबाबत जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. पीक विम्याची रक्कम कमी मिळाल्याच्या तक्रारींची चौकशी केली असता काही बाबी समोर आल्या आहेत. शेतकऱ्यांना विमा रक्कम वितरित करताना स्थानिक नैसर्गिक आपत्ती, काढणी पश्चात नुकसान व पीक कापणी प्रयोगाच्या आधारे आलेल्या उत्पन्नाच्या आधारावर आदी जोखमीच्या बाबींच्या आधारावर वितरित करण्यात येते.

सध्या शेतकऱ्यांना मिळालेली रक्कम पीक कापणी प्रयोगात आलेल्या उत्पन्नाच्या आधारे मिळालेली आहे. परंतु यापूर्वी शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती व काढणी पश्चात नुकसान यांच्या आधारे पिक विमा रक्कम जास्त प्रमाणामध्ये मिळालेली आहे. नियमानुसार किमान रक्कम १ हजार रू. नुकसान भरपाई शेतक-यास अदा करणे आवश्यक आहे. तपासणीमध्ये कोणत्याही शेतक-याला किमान रक्कम रुपये १ हजार रू. किंवा त्यापेक्षा जास्त नुकसान भरपाई अदा केलेली असल्याचे आढळून आले आहे, असे स्पष्टीकरण जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande