
अकोला, 31 ऑक्टोबर (हिं.स.)।
भारतीय कपास महामंडळाने कपास किसान मोबाईल ॲप सुरू केले आहे. या ॲपवर अकोला आणि औरंगाबाद शाखेसाठी स्लॉट बुकींग सुरू करण्यात आली आहे. ही स्लॉट बुकींग सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होणार आहे.
कापूस किसान मोबाईल ॲपद्वारे नोंदणी आणि स्लॉट बुकींग प्रक्रियेस मदत करण्यासाठी लिंक तयार करण्यात आली आहे. यात ॲपमध्ये नोंदणी व स्लॉट बुकींगसाठी सविस्तर माहिती व पायऱ्या दिलेल्या आहेत. शेतकऱ्यांसाठी youtube.com/@KapasKisan-official वर उपलब्ध आहे. स्लॉट बुकींग प्रक्रीयेत स्लॉट बुकींग सुविधा 7 दिवसाच्या रोलिंग बेसिसवर खुली राहील. प्रत्येक दिवशी एक तारीख बंद होईल व दुसऱ्या दिवशी नवीन तारीख खुली केली जाईल.
कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कपास किसान ॲपवर तातडीने नोंदणी करावी. तसेच सीसीआयच्या खरेदी केंद्रावर कापूस विक्रीस येण्यापूर्वी स्लॉट बुकींग करावी, असे आवाहन महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे