नाफेडमध्ये ऑनलाइन प्रक्रिया ठप्प; शेतकऱ्यांचा रास्ता रोको, तहसीलदारांनी घेतले नियंत्रणात!
अकोला, 31 ऑक्टोबर (हिं.स.)। अकोल्याच्या बाळापूर तालुक्यात नाफेडची ऑनलाइन प्रक्रिया ठप्प झाल्याने शेतकऱ्यांनी आज शहरात रास्ता रोको आंदोलन केले. सर्व्हर बंद व धीम्या गतीने सुरू असल्याने दिवसातून फक्त चार ते पाच शेतकऱ्यांचे नोंद घेतली जात असल्याने शे
P


अकोला, 31 ऑक्टोबर (हिं.स.)।

अकोल्याच्या बाळापूर तालुक्यात नाफेडची ऑनलाइन प्रक्रिया ठप्प झाल्याने शेतकऱ्यांनी आज शहरात रास्ता रोको आंदोलन केले. सर्व्हर बंद व धीम्या गतीने सुरू असल्याने दिवसातून फक्त चार ते पाच शेतकऱ्यांचे नोंद घेतली जात असल्याने शेतकरी संतप्त झाले. यादरम्यान, नाफेड कार्यालय व कृषी उत्पन्न बाजार समिती विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन तीव्र झाले. परिस्थिती हाताबाहेर जाताच नाफेड अधिकाऱ्यांनी तहसीलदार व पोलिसांना पाचारण केले. तहसीलदार व पोलिस प्रशासानाने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. नायब तहसीलदार सैयद यांनी तात्पुरत्या स्वरूपात काही शेतकऱ्यांची नावे कागदावर घेऊन प्रक्रिया सुरू ठेवण्याचे आदेश दिले.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande