
अकोला, 31 ऑक्टोबर (हिं.स.)। देशाचे पहिले गृहमंत्री आणि लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्तआणि देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या स्मृतीदिनानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन कार्यक्रम झाला. यावेळी अधिकारी व कर्मचा-यांनी राष्ट्रीय एकतेची शपथ घेतली.
या प्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील यांनी लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या, तसेच माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सर्व अधिकारी व कर्मचा-यांनी पुष्प वाहून अभिवादन केले.सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती ‘राष्ट्रीय एकता दिवस’ म्हणून साजरी करण्यात येते. या निमित्ताने निवासी उपजिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय एकतेची शपथ दिली. अधिक्षक श्याम धनमने व अनेक अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे