एडीएमएम-प्लस बैठकीत संरक्षणमंत्री व अमेरिकन युद्धमंत्र्यांची भेट
नवी दिल्‍ली, 31 ऑक्टोबर (हिं.स.)। मलेशियात क्वालालंपूर येथे आयोजित 12व्या आसियान संरक्षण मंत्र्यांच्या – प्लस बैठकीच्या (एडीएमएम-प्लस) अनुषंगाने आज (31 ऑक्टोबर) संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी अमेरिकेचे युद्ध मंत्री पीट हेग्सेथ यांची भेट घेतली. ही
Defence Minister and US Secretary


Defence Minister US Secretary War meet


नवी दिल्‍ली, 31 ऑक्टोबर (हिं.स.)। मलेशियात क्वालालंपूर येथे आयोजित 12व्या आसियान संरक्षण मंत्र्यांच्या – प्लस बैठकीच्या (एडीएमएम-प्लस) अनुषंगाने आज (31 ऑक्टोबर) संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी अमेरिकेचे युद्ध मंत्री पीट हेग्सेथ यांची भेट घेतली. ही बैठक रचनात्मक ठरली आणि प्रतिनिधी मंडळ चर्चेनंतर अशी थेट व्दिपक्षीय बैठक झाली.

दोन्ही देशांतील द्विपक्षीय संरक्षण सहकार्यातील सातत्यपूर्ण गतिशीलतेची उभय नेत्यांनी प्रशंसा केली आणि या सहकार्याच्या सर्व स्तंभांच्या बाबतीत परस्पर लाभदायक भागीदारी करण्‍याविषयी कटिबद्धतेला दुजोरा दिला. विद्यमान संरक्षणविषयक समस्या आणि सध्याच्या आव्हानांचा आढावा यावेळी घेतला आणि संरक्षण उद्योग आणि तंत्रज्ञान क्षेत्रात सध्या असलेल्या सहयोगी संबंधांबाबत चर्चा केली.

संरक्षण सहकार्य क्षेत्रात अमेरिकेसाठी भारत हा प्राधान्यक्रम असलेला देश आहे आणि मुक्त तसेच खुल्या हिंद-प्रशांत क्षेत्राच्या सुनिश्चितीसाठी ते भारतासोबत एकत्रितपणे काम करण्याविषयी वचनबद्ध आहेत याचा युध्द मंत्र्यांनी पुनरुच्चार केला.

या बैठकीनंतर दोन्ही नेत्यांनी आधीच मजबूत असलेल्या संरक्षण भागीदारीत एका नव्या युगाचा प्रारंभ करणाऱ्या ‘अमेरिका-भारत प्रमुख संरक्षण भागीदारीसाठीच्या आराखड्या’वर स्वाक्षऱ्या केल्या. 2025 मध्ये केलेला हा आराखडा आगामी 10 वर्षांतील भागीदारीमध्ये आणखी परिवर्तन घडवून आणणारा नवा अध्याय ठरणार आहे. संरक्षण सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी एकीकृत दृष्टीकोन आणि धोरणात्मक दिशा देणे हा या आराखड्याचा हेतू आहे.

सदर आराखडा भारत-अमेरिका संरक्षणविषयक नात्याच्या संपूर्ण श्रेणीसाठी धोरणात्मक दिशा देईल असा विश्वास ‘एक्स’ मंचावर लिहीलेल्या संदेशात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला. “हा आपल्या वाढत्या धोरणात्मक एककेंद्राभिमुखतेचा निदर्शक आहे आणि तो भागीदारीच्या नव्या दशकाचा प्रारंभ करेल. संरक्षण क्षेत्र हा आपल्या द्विपक्षीय नात्याचा मुख्य स्तंभ राहील. मुक्त, खुल्या आणि नियमबद्ध हिंद-प्रशांत क्षेत्राच्या सुनिश्चितीसाठी आपली भागीदारी अत्यंत महत्त्वाची आहे,” त्यांनी लिहिले.

एका संदेशात पीट हेग्सेथ म्हणाले की, क्षेत्रीय स्थैर्य आणि प्रतिबंध यांची कोनशीला असलेला हा आराखडा द्विपक्षीय संरक्षण भागीदारीला पुढे नेतो. त्यांनी लिहीले, “आम्ही, आमच्यातील समन्वय, माहितीचे सामायीकीकरण तसेच तांत्रिक सहकार्य वाढवत आहोत. आमचे संरक्षण संबंध कधीही इतके मजबूत नव्हते.”

लष्करांदरम्यानचे सराव आणि उपक्रम, माहितीचे सामायीकीकरण, समान विचारांच्या क्षेत्रीय आणि जागतिक भागीदारांशी सहयोग, संरक्षण क्षेत्रातील औद्योगिक, वैज्ञानिक तसेच तंत्रज्ञानविषयक सहकार्य तसेच संरक्षण समन्वय यंत्रणा यांच्या माध्यमातून भारत आणि अमेरिका हे देश त्यांच्यातील संरक्षणविषयक नाते सातत्याने विस्तारुन आणखी सखोल करत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande