
नवी दिल्ली , 31 ऑक्टोबर (हिं.स.)। खराब हवामानामुळे केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारमण यांचा भूटान दौरा रद्द करण्यात आला आहे. त्या भूटानच्या चार दिवसांच्या अधिकृत दौऱ्यासाठी गुरुवारी रवाना झाल्या होत्या. त्या वित्त मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाच्या एका प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व करत होत्या. दौरा रद्द झाल्यानंतर त्या सिलीगुडी येथे रात्री विश्रांतीसाठी थांबल्या आणि शुक्रवारी सकाळी दिल्लीत पोहचल्या.
वित्त मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने शुक्रवारी सांगितले की भूटानमधील पारो येथे खराब हवामानामुळे हा अधिकृत दौरा रद्द करण्यात आला आहे. याआधी गुरुवारी जारी केलेल्या विधानानुसार, वित्त मंत्री त्यांच्या अधिकृत भेटीच्या पहिल्या दिवशी ऐतिहासिक सांगचेन चोखोर मठाचा दौरा करणार होत्या.
सांगचेन चोखोर मठाची स्थापना १७६५ साली झाली होती आणि येथे बौद्ध अध्ययन करणाऱ्या १०० हून अधिक भिक्षू राहतात.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode