
नंदुरबार, 31 ऑक्टोबर (हिं.स.) राज्यातील मदरसांचे आधुनिकीकरण करण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या डॉ. झाकीर हुसेन मदरसा
आधुनिकीकरण योजनेअंतर्गत सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठी अनुदान मिळवू इच्छिणाऱ्या मदरस्यांनी
त्यांचे प्रस्ताव 14 नोव्हेंबर, 2025 पर्यंत सादर करावे असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी तथा जिल्हा
अल्पसंख्याक अधिकारी शशांक काळे यांनी केले आहे.
डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेअंतर्गत रुपये 10 लाख रक्कमेपर्यंत प्रस्ताव सादर करता
येणार असून इछुक मदरस्यांनी जिल्हा अल्पसंख्यांक अधिकारी तथा जिल्हा नियोजन अधिकारी, जिल्हा
नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार यांच्याकडे मुदतीत प्रस्ताव सादर करावे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर