बांगलादेशच्या न्यायालयाने मला मृत्युदंडाची शिक्षा दिली तरी मी घाबरत नाही - शेख हसीना
नवी दिल्ली , 31 ऑक्टोबर (हिं.स.)। बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी पुन्हा एकदा बांगलादेशातील मोहम्मद यूनुस यांच्या सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात बांगलादेशात झालेल्या लष्करी उठावाबाबत (कू) त्यांनी मोठा दावा
बांगलादेशच्या न्यायालयाने मला मृत्युदंडाची शिक्षा दिली तरी मी घाबरत नाही- शेख हसीना


नवी दिल्ली , 31 ऑक्टोबर (हिं.स.)। बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी पुन्हा एकदा बांगलादेशातील मोहम्मद यूनुस यांच्या सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात बांगलादेशात झालेल्या लष्करी उठावाबाबत (कू) त्यांनी मोठा दावा केला आहे.शेख हसीना म्हणाल्या की, ५ ऑगस्ट रोजी बांगलादेश मोठ्या प्रमाणावर आंदोलनांनी हादरला होता, आणि त्या वेळी देशात राहणे त्यांच्या दृष्टीने धोक्याचं ठरलं असतं.

एका मुलाखतीत शेख हसीना यांनी त्यांच्या विरोधात लावण्यात आलेल्या त्या आरोपांचे खंडन केले, ज्यात म्हटलं गेलं होतं की पंतप्रधान असताना त्यांनी आंदोलकांवर गोळीबार करण्याची परवानगी दिली होती.त्या म्हणाल्या, “गेल्या वर्षीच्या आंदोलनांच्या काळात बांगलादेशात राहिल्याने फक्त माझ्या जीवाला नाही, तर माझ्या आजूबाजूच्या लोकांच्या जीवालाही धोका निर्माण झाला असता. तरीसुद्धा मी देशात लोकशाही पुनर्स्थापित करण्यास वचनबद्ध आहे. एक नेत्या म्हणून मी जबाबदारी स्वीकारते. त्या पुढे म्हणाल्या, “हे पूर्णपणे चुकीचे आहे की मी सुरक्षा दलांना जमावावर गोळीबार करण्याचा आदेश दिला होता. जमीनी स्तरावर सुरक्षा दलांमध्ये शिस्तीचा अभाव असल्यामुळे मृतांची संख्या वाढली. सरकारने या सुरुवातीच्या हत्यांची स्वतंत्र चौकशी सुरू केली होती, पण नंतर यूनुस सरकारने ती चौकशी थांबवली.”

त्यांनी पुढे असेही सांगितले की, जर बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने (ICT) त्यांना मृत्युदंड सुनावला, तर त्यांना त्याचे आश्चर्यही वाटणार नाही आणि भीतीही नाही. शेख हसीना म्हणाल्या, “हा एक दिखाऊ न्यायालय आहे, ज्याचे संचालन माझ्या राजकीय विरोधकांच्या एका अनिर्वाचित सरकारकडून केले जात आहे. माझे अनेक विरोधक मला सत्तेतून हटवण्यासाठी कोणत्याही टोकाला जाऊ शकतात.”

गेल्या वर्षी बांगलादेशात सरकारी नोकऱ्यांतील कोटा रद्द करण्याच्या मागणीसाठी सुरू झालेले आंदोलन लवकरच एका राष्ट्रव्यापी बंडात परिवर्तित झाले होते. यामुळे शेख हसीना यांना देश सोडून पळावे लागले होते. अंतरिम सरकारचे मुख्य अभियोक्ता ताजुल इस्लाम यांनी शेख हसीनांवर आरोप केला आहे की, विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या त्या बंडादरम्यान झालेल्या हत्यांच्या मागे त्या “मुख्य सूत्रधार” होत्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande