संजय राऊत यांची तब्येत बिघडली, रुग्णालयात दाखल
मुंबई, 31 ऑक्टोबर (हिं.स.) : शिवसेनेच्या उबाठा-गटाचे नेते खासदार संजय राऊत यांना मुंबईच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. खा. राऊत यांनी आपल्या समर्थकांना पाठवलेल्या पत्रात ही माहिती दिली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार 2 महिन्यांसाठी सार
शिवसेना-उबाठा खासदार संजय राऊत


मुंबई, 31 ऑक्टोबर (हिं.स.) : शिवसेनेच्या उबाठा-गटाचे नेते खासदार संजय राऊत यांना मुंबईच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. खा. राऊत यांनी आपल्या समर्थकांना पाठवलेल्या पत्रात ही माहिती दिली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार 2 महिन्यांसाठी सार्वजनिक जीवनापासून दूर राहावे लागणार असल्याचे राऊत यांनी सांगितले आहे.

आपल्या पत्रात राऊत म्हणाले की, अचानक माझ्या प्रकृतीत काही गंभीर बिघाड झाल्याचे निदर्शनास आले आहे. उपचार सुरू आहेत आणि मी लवकरच बरा होईन. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मला सध्या बाहेर जाणे आणि गर्दीत मिसळणे टाळावे लागणार आहे. दुसरा पर्याय नाही. मला खात्री आहे की मी लवकरच पूर्णपणे बरा होईन आणि नववर्षात आपण सर्वांना भेटेन. आपले प्रेम आणि आशीर्वाद असेच कायम राहो असे राऊत यांनी पत्रात नमूद केले आहे.

संजय राऊत यांच्या नीकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा मुंबईतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, मात्र आजाराचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. काही दिवसांपूर्वीही त्यांना गळ्यातील त्रासामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता पुन्हा एकदा तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, ते दोन महिन्यांसाठी सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर राहणार आहेत.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande