नाशिकमध्ये महाराष्ट्र - सौराष्ट्राचे रणजी संघ भिडणार
नाशिक, 31 ऑक्टोबर (हिं.स.)। नाशिकच्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानामध्ये शनिवारपासून रणजी करंडक क्रिकेट सामन्याला सुरुवात होत आहे. त्यासाठी नासिक मध्ये महाराष्ट्र व सौराष्ट्र हे दोन्हीही संघ दाखल झाले आहे . या दोन्हीही संघांनी विजयाचा दावा केला
आजपासून महाराष्ट्र - सौराष्ट्र संघ रणजी भिडणार ,


नाशिक, 31 ऑक्टोबर (हिं.स.)। नाशिकच्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानामध्ये शनिवारपासून रणजी करंडक क्रिकेट सामन्याला सुरुवात होत आहे. त्यासाठी नासिक मध्ये महाराष्ट्र व सौराष्ट्र हे दोन्हीही संघ दाखल झाले आहे . या दोन्हीही संघांनी विजयाचा दावा केला आहे .

नासिक मधील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानामध्ये महाराष्ट्र विरुद्ध सौराष्ट्र आता रणजी करंडक क्रिकेट सामना सुरू होत आहे या सामन्यांमध्ये आत्तापर्यंत दोन्हीही संघांनी खेळलेल्या सामन्यात महाराष्ट्र नऊ गुण आहेत तर सौराष्ट्राला आपलं खाते देखील उघडता आलेले नाही सकाळी सामन्यांमध्ये सौराष्ट्र गुण मिळू नका याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. या संघातील खेळाडूंचे स्वागत नाशिक क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विनोद शहा सेक्रेटरी समीर रकटे व इतर पदाधिकाऱ्यांनी केले . या सामन्यापूर्वी दोन्ही संघाच्या कर्णधारांसह मान्यवर खेळाडूंनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया.

घरच्या मैदानावर खेळण्याचाआनंद वेगळाच- बावणेमहाराष्ट्र संघाचा कर्णधार अंकित बावणे म्हणाला की, गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्राच्या संघाकडून खेळत आहे आणि आता महाराष्ट्राच्या संघाचा कर्णधार आहे. मागील वर्षी किंवा त्यापूर्वी महाराष्ट्राचा संघ कसा होता हे पाहण्यापेक्षा मी संघाला रणजीचे विजेतेपदक मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे. ऋतुराज गायकवाड आणि पृथ्वी शॉ यांच्यामुळे संघ भक्कम आहे. या हंगामातील मागील दोन सामने आम्ही बाहेर खेळलो आता मात्र घरच्या मैदानावर आम्ही खेळणार असल्याने आमच्यासाठी निश्चितच आनंददायक आहे. नाशिककरांची आम्हाला निश्चितच साथ मिळत असते. चंदीगडविरूद्धच्या सामन्यात आमच्या फलंदाजांबरोबरच गोलंदाजांनीही चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे फलंदाजांबरोबरच गोलंदाजही फॉर्मात आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉ याने सांगितले की, चंदीगडविरूद्धच्या सामन्यात जी खेळी केली होती तीच खेळी सौराष्ट्राविरूद्धच्या सामन्यात कायम ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. जयदेव उनाडकट आणि इतर गोलंदाजांना मी पहिलेही खेळलो असल्यामुळे आता महाराष्ट्राकडून खेळतांना त्याचा निश्चितच फायदा होईल. माझा खेळ हा वैयक्तिक स्वरूपाचा नसून मी टिमसाठी खेळत असतो त्यामुळे टिमला कसा विजय मिळेल हेच मी पाहत असतो.भारतीय संघात निवड होईल की नाही आणि आता मी रणजी ट्रॉफीमध्ये किती धावा केल्या आहेत ते पाहत नाही. मी केवळ खेळण्याचे काम करतो. गुरूवारी भारतीय महिला क्रिकेट खेळाडूंनी उत्तम खेळ केला. मी तो सामना पूर्ण पाहिला.

विरोधी संघाचा अभ्यास करूनच रणनितीसौराष्ट्र संघाचा कर्णधार जयदेव उनाडकट म्हणाला की, नाशिकच्या अनंत कान्हेरे मैदानावर यापूर्वी मी खेळलेलो आहे. येथील खेळपट्टीचा मला अनुभव आहे. त्याचबरोबर काही सिनिअर खेळाडू रिटायर झाले असून, नवीन खेळाडू आता संघात आहे. त्यांना बरोबर घेऊन खेळावे लागत आहे. असे असले तरी आम्ही जिंकण्यासाठीच खेळणार आहे. महाराष्ट्राच्या संघाविरूद्ध रणनिती तयार केली असून, ती आताच सांगणे अवघड आहे. मात्र त्याचे चांगले दुवे आणि खराब दुवे यांच्यावर आम्ही अभ्यास केला आहे. आमचे यंदाच्या मोसमात कर्नाटक आणि केरळ विरूद्ध सामने झाले आहेत. येथे पाऊस पडल्यानंतर खेळपट्टी थोडी ओलसर आहे त्याचा फायदा जलदगती गोलंदाजांना होणार आहे. खेळपट्टी ही लालमातीची असल्याने आम्ही त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करू.

खेळपट्टी जलदगतीगोलंदाजांना साथ देणारीसौराष्ट्रच्या चेतन साकारिया याने सांगितले की, नाशिकच्या या खेळपट्टीवर यापूर्वी म्हणजे २०१९ मध्ये खेळलो आहे.त्यामुळे येथील खेळपट्टीची आम्हाला जाणीव आहे. येथील खेळपट्टी ही निश्चितच जलदगती गोलंदाजांना मदत करेल, असे वाटते. नाशिकमधील त्यावेळचे क्रिकेट आणि आताचे क्रिकेट यामध्ये फरक वाटत आहे. त्यावेळी आम्ही या खेळपट्टी विजय मिळवला होता, त्याच्या आठवणी आमच्यासाठी ताज्या आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande