निवृत्तीवेतनधारकांना 30 नोव्हेंबरपर्यंत हयातीचा दाखला सादर करण्याचे आवाहन
नंदुरबार, 31 ऑक्टोबर (हिं.स.) जिल्हा कोषागार कार्यालयातून निवृत्तीवेतन घेणाऱ्या सर्व महाराष्ट्र राज्य शासकीय सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी 1 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत आपला हयातीचा दाखला सादर करावा असे आवाहन जिल्हा
निवृत्तीवेतनधारकांना 30 नोव्हेंबरपर्यंत हयातीचा दाखला सादर करण्याचे आवाहन


नंदुरबार, 31 ऑक्टोबर (हिं.स.) जिल्हा कोषागार कार्यालयातून निवृत्तीवेतन घेणाऱ्या सर्व महाराष्ट्र राज्य शासकीय सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी 1 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत आपला

हयातीचा दाखला सादर करावा असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी संजय खडसे यांनी केले आहे.

निवृत्तीवेतनधारकांना हयातीचा दाखला सादर करण्यासाठी जिल्हा कोषागार कार्यालयाने दोन पर्याय

उपलब्ध करून दिले आहेत:

१. बँकेत प्रत्यक्ष हजर राहून:

 निवृत्तीवेतनधारक ज्या बँकेतून पेन्शन घेतात, त्या संबंधित बँक शाखेत 1 ते 30 नोव्हेंबर, 2025

या कालावधीत (कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी) प्रत्यक्ष हजर राहावे.

 त्यांच्या आद्याक्षरनिहाय अद्ययावत यादीत, शाखा व्यवस्थापकासमक्ष त्यांच्या नावापुढे स्वाक्षरी

किंवा अंगठ्याचा ठसा करू शकतात.

२. ऑनलाईन जीवनप्रमाण प्रणाली:

 ऑनलाईन ‘जीवनप्रमाण’ प्रणालीमध्ये आपले हयातीचे दाखले नोंदवणे.

 नोंदणी करताना घ्यावयाची काळजी (महत्वाच्या सूचना):

 पीपीओ (PPO) वरील आपले नाव नमूद करावे.

 पीपीओ नंबर खात्री करून नमूद करावा.

 कोषागार कार्यालय नंदुरबार नमूद करावे.

निवृत्तीवेतनधारकांनी निर्धारित मुदतीत हयातीचा दाखला सादर न केल्यास, त्यांचे डिसेंबर 2025

पासूनचे निवृत्तीवेतन स्थगीत (थांबवण्यात) करण्यात येईल, त्यामुळे निवृत्तीवेतनधारकांनी नमूद केलेल्या

वेळेत आणि पर्यायानुसार हयातीचा दाखला सादर करावा.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande