
नाशिक, 31 ऑक्टोबर (हिं.स.)। - विकासाला आमचा विरोध नाही परंतु चुकीच्या पद्धतीप्रमाणे भूसंपादन करून नागरिकांना रस्त्यावरती आणण्याची जी पद्धत आहे ती चुकीची आहे त्याला आमचा विरोध आहे असे सांगून माजी नगरसेवक दिनकर पाटील यांनी सत्ताधारी भाजपावरती निशाणा साधताना सांगितले की, नागरिकांचे मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी जर मंत्री मुख्यमंत्री स्वतः आले तर काय फरक पडतो असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला नाशिक त्रंबक , तसेच घोटी त्रंबक रस्त्यावरील जागा नासिक विकास प्राधिकरण ताब्यामध्ये घेऊन त्या पद्धतीप्रमाणे नागरिकांना वर्षानुवर्ष असलेली जागा ही अतिक्रमण म्हणून निश्चित केली आहे आणि ते अतिक्रमण तोडण्याचे काम सुरू केलेलं आहे या विरोधात प्रत्यक्षात कैलास खांडबहाले यांनी लाक्षणिक उपोषण सुरू केलेले आहे. त्यांना वेगवेगळ्या राजकीय पक्ष सामाजिक संघटना हे पाठबळ देत आहे तर यावर तोडगा काढण्यासाठी म्हणून माजी सभागृह नेते मनसेचे ज्येष्ठ नेते दिनकर पाटील यांनी तळेगाव येथे दामोदर पॅलेस लोन मध्ये सर्व बाधित शेतकऱ्यांचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याला मनसेचे ज्येष्ठ नेते सलीम मामा शेख यांच्यासह अन्य उपस्थित होते. त्या मेळाव्यामध्ये बाधित झालेल्या शेतकऱ्यांनी सांगितले की मुळात वर्षानुवर्ष या जमिनी आमच्या परिवाराच्या नावावरती आहे असं सर्व असताना नाशिक विकास प्राधिकरण या जमिनी अतिक्रमणाच्या नावावरती ताब्यात घेऊन आमचे आर्थिक आणि मानसिक नुकसान करीत आहे आमचा छळ करीत आहे असे सांगून अनेक शेतकऱ्यांनी या जमिनी ताब्यात देण्यासाठी तीव्र विरोध केला. या मेळाव्याला संबोधित करताना माजी नगरसेवक ज्येष्ठ नेते दिनकर पाटील यांनी सांगितले की, अतिशय चुकीच्या पद्धतीप्रमाणे नाशिक विकास प्राधिकरण हे काम करत आहे विकासाला कोणत्याही शेतकऱ्याचा किंवा कोणाचाही विरोध नाही परंतु मध्येच 100 मीटर रस्ता आणि मध्येच त्यापेक्षा कमी मीटरचा रस्ता केला जात आहे हे कसे शक्य आहे या ठिकाणी येणारे गर्दी ही कमी जास्त होणार आहे का यासारखे अनेक प्रश्न उपस्थित करून दिनकर पाटील यांनी सत्ताधारी भाजपावरती जोरदार हल्ला चढविताना सांगितले की सातत्याने मुख्यमंत्री फडणवीस हे गिरीश महाजन हे कुंभमेळा मंत्री आहेत आणि ते येणार आहेत ते चर्चा करणार आहेत असे सांगतात परंतु गिरीश महाजन यांना येण्यास वेळ नाही त्यांनी माझ्यासारखा कार्यकर्ता हा अकरा वर्ष वापरून घेतला आणि त्यानंतर वाऱ्यावरती सोडून दिलं असे सांगून पाटील म्हणाले की सर्वांनी आता एकत्र येऊन या विरोधात लढा करण्याचा संकल्प केलेला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV