
नंदुरबार,, 31 ऑक्टोबर (हिं.स.) धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल तसेच अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल असलेल्या शासन मान्य खाजगी अनुदानित/विना अनुदानित/कायम विना अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण
संस्था, नगरपालिका/नगरपरिषद शाळा आणि अपंग शाळांमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी शासनाने
अनुदान योजना राबवण्यास मान्यता दिली असून सन 2025-26 या आर्थिक वर्षात अनुदान घेऊ
इच्छिणाऱ्या शाळांनी आपले प्रस्ताव 14 नोव्हेंबरपर्यंत सादर करावे, असे आवाहन जिल्हा
नियोजन अधिकारी तथा जिल्हा अल्पसंख्याक अधिकारी शशांक काळे यांनी केले आहे.
या योजनेअंतर्गत पायाभूत सोयीसुविधांसाठी देण्यात येणाऱ्या अनुदानाची मर्यादा रुपये 10 लाख असून
इछुक अल्पसंख्यांक शाळा, औद्योगिक संस्था व अपंग शाळा यांनी जिल्हा अल्पसंख्यांक अधिकारी तथा
जिल्हा नियोजन अधिकारी, जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार यांच्याकडे
मुदतीत प्रस्ताव सादर करावे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर