आदिवासी विद्यार्थ्यांसाठी स्पोर्ट्स ॲकॅडमी सुरू करणार. डॉ. वुईके
नाशिक, 31 ऑक्टोबर (हिं.स.)।आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांमध्ये विविध उपजत गुण असतात. या विद्यार्थ्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी राज्यात स्पोर्ट्स ॲकॅडमी सुरु करण्यात येईल. कोणत्याही परिस्थितीत यंदा स्पोर्ट्स ॲकॅडमीला मंजुरी मिळेल. य
आदिवासी विद्यार्थ्यांसाठी स्पोर्ट्स ॲकॅडमी सुरू करणार. डॉ. वुईके: एकलव्य स्कूल राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे दिमाखात शुभारंभ


नाशिक, 31 ऑक्टोबर (हिं.स.)।आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांमध्ये विविध उपजत गुण असतात. या विद्यार्थ्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी राज्यात स्पोर्ट्स ॲकॅडमी सुरु करण्यात येईल. कोणत्याही परिस्थितीत यंदा स्पोर्ट्स ॲकॅडमीला मंजुरी मिळेल. या ॲकॅडमीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सुमारे सहाशे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्यात येतील, अशी घोषणा राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी केली.

शुक्रवारी (दि.३१) पंचवटीतील स्व. मीनाताई ठाकरे स्टेडियमवर महाराष्ट्र ट्रायबल पब्लिक स्कुल सोसायटी आयोजित एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूलच्या तीन दिवसीय राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर खासदार डॉ. शोभा बच्छाव, आमदार नितीन पवार, किशोर काळकर, महाराष्ट्र ट्रायबल पब्लिक स्कुल सोसायटीच्या सदस्य सचिव तथा आदिवासी विकास आयुक्त लीना बनसोड, अपर आयुक्त (ठाणे) गोपीचंद कदम, अपर आयुक्त (नाशिक ) दिनकर पावरा, उपायुक्त संतोष ठुबे, विनिता सोनवणे, प्रकल्प अधिकारी अकुनुरी नरेश, अर्पिता ठुबे, देवकन्या बोकडे आदी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेबाबत तडजोड केली जाणार नाही. पात्रताधारक शिक्षकांमार्फत विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण दिले जाईल. विद्यार्थ्यांना दिशा देण्याची जबाबदारी शिक्षकांवर असणार आहे. विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणांना वाव मिळाला पाहिजे. विद्यार्थ्यांमुळे आपण असल्याचे भान प्रत्येक शिक्षकांनी ठेवावे. विद्यार्थी केंद्रबिंदू ठेवून शिक्षकांनी कामकाज करण्याचे आवाहन ना. डॉ. वुईके यांनी केले.

आदिवासी समाजातील विद्यार्थी अभ्यासासोबत खेळातही गणला पाहिजे, हे उद्दिष्टे डोळ्यासमोर स्पोर्ट्स ॲकॅडमीबाबत सकारात्मक निर्णय घेतले जातील. शासनाने आदिवासी विद्यार्थ्यावर लक्ष केंद्रित केले आहे. विद्यार्थ्यांनी स्पर्धेत खेळाडूवृत्तीने प्रदर्शन करावे, असे ना. डॉ. वुईके यांनी सांगितले. तर क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून एकजूट, विश्वास आणि सहकार्याची भावना दृढ होते. खेळातून खेळाडूवृत्ती, सांघिक भावना आणि संतुलित विकास होतो, असे खा. डॉ. बच्छाव यांनी सांगितले.

आदिवासी विकास आयुक्त लीना बनसोड म्हणाल्या की, जय-पराजय हा खेळाचा अविभाज्य भाग आहे. त्यातून खेळाडूवृत्ती शिकली पाहिजे. खेळातून सांघिक भावना निर्माण होते. विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच खेळाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच कला-क्रीडा क्षेत्राचा विचार करावा.

राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याला आदिवासी सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगत आणली. विद्यार्थ्यांनी सादरीकरणातून पारंपरिक कला-सांस्कृतीचे दर्शन घडवत लक्ष वेधून घेतले. मल्लखांब आणि जिम्नॅस्टिक्सच्या प्रात्यक्षिकांनी उपस्थितांची मने जिंकून घेतली.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande