नवी दिल्ली, 6 ऑक्टोबर (हिं.स.)। बिहार विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाने (आप) सोमवारी 11 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. आपच्या बिहार राज्य युनिटने एक्स -पोस्टद्वारे ही माहिती शेअर केली.
'आप'ने दिलेल्या माहितीनुसार, डॉ. मीरा सिंह यांना बेगूसराय विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. योगी चौपाल यांना कुशेश्वर (दरभंगा), अमित कुमार सिंग यांना तरैया (सारण), भानू भारतीय यांना कस्बा (पूर्णिया), शुभदा यादव बेनीपट्टी (मधुबनी), अरुण कुमार राजक यांना फुलवारी (पाटणा), डॉ. पंकज कुमार यांना बांकीपुर (पाटणा), अशरफ आलम यांना किशनगंज (किशनगंज), अखिलेश नारायण ठाकूर यांना परिहार (सीतामढी), अशोक कुमार सिंग यांना गोविंदगंज (मोतिहारी) आणि माजी कॅप्टन धर्मराज सिंह यांना बक्सर (बक्सर) अश्या 11 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. तर बिहार विधानसभेत एकूण 243 जागा आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule