बिहार विधानसभा निवडणूक : आगामी 6 आणि 11 नोव्हेंबरला मतदान
नवी दिल्ली, 6 ऑक्टोबर (हिं.स.) : बिहार विधानसभा निवडणुकांसाठी आज, सोमवारी निवडणूक आयोगाने तारीखांची घोषणा केली. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितले की, बिहार विधानसभेचा सध्याच
ज्ञानेश कुमार, मुख्य निवडणूक आयुक्त


नवी दिल्ली, 6 ऑक्टोबर (हिं.स.) : बिहार विधानसभा निवडणुकांसाठी आज, सोमवारी निवडणूक आयोगाने तारीखांची घोषणा केली. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितले की, बिहार विधानसभेचा सध्याचा कार्यकाळ 22 नोव्हेंबर 2025 रोजी समाप्त होत आहे. अनेक राजकीय पक्षांनी छठ महापर्वानंतर लगेच निवडणूक घेण्याची मागणी केली होती, जेणेकरून नागरिक मोठ्या संख्येने मतदान करू शकतील. बिहारमधील सर्व 243 विधानसभा मतदारसंघांमध्ये 2 टप्प्यांत मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान 6 नोव्हेंबर रोजी दुसऱ्या टप्प्यातील मतदान 11 नोव्हेंबर रोजी होईल.निवडणुकीचा निकाल 14 नोव्हेंबरला जाहीर केला जाईल निवडणुकीची सर्व तयारी पूर्ण करण्यात आल्या असून, निवडणुकीदरम्यान हिंसा अजिबात सहन केली जाणार नाही. तसेच खोट्या बातम्यांवर (फेक न्यूज) देखील कठोर नजर ठेवण्यात येईल असे ज्ञानेशकुमार यांनी सांगितले.

बिहारमधील मतदारांची संख्या

मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, बिहारमध्ये एकूण सुमारे 7.43 कोटी मतदार आहेत. त्यापैकी 3.92 कोटी पुरुष आणि 3.50 कोटी महिला मतदार आहेत. तर तृतीयपंथी मतदारांची संख्या 1725 इतकी आहे. तसेच दिव्यांग मतदार 7.2 लाख असून 4.04 लाख ज्येष्ठ नागरिक आहेत. त्याचप्रमाणए 14 हजार मतदार वय 100 वर्षांहून अधिक असून सुमारे 14 लाख प्रथमच मतदार होणारे युवक आहेत.

यापूर्वी 2020 मध्ये बिहार विधानसभा निवडणुका 3 टप्प्यांत पार पडल्या होत्या. त्यावेळी 28 ऑक्टोबर 2020 रोजी 71 जागांवर, 3 नोव्हेंबर रोजी 94 आणि 7 नोव्हेंबर रोजी 78 जागांवर मतदान झाले होते. तर मतमोजणी 10 नोव्हेंबर 2020 रोजी झाली होती.

-------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande