भुवनेश्वर, 6 ऑक्टोबर (हिं.स.)। ओडिशातील कटकमध्ये दुर्गा पूजा विसर्जन मिरवणुकीदरम्यान दगडफेक, हिंसाचार, तोडफोड आणि सुरक्षा दलांवर हल्ल्यांच्या घटनांप्रकरणी पोलिसांनी आठ जणांना अटक केली आहे.
पोलिस आयुक्त एस. देवदत्त सिंह यांनी सोमवारी सांगितले की सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांवरून आरोपींची ओळख पटली आहे. ते सध्या चौकशीसाठी कोठडीत आहेत. रॅलीदरम्यान पोलिसांवर दगडफेक झाल्यानंतर शहरात ३६ तासांचा संचारबंदी लागू करण्यात आल्याचे पोलिस आयुक्तांनी सांगितले.परिस्थिती आता सामान्य आहे आणि कोणत्याही नवीन घटनेची नोंद झालेली नाही. ते म्हणाले की, गुन्हेगारांची ओळख पटली आहे आणि त्यांना अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे.आतापर्यंत आठ जणांना अटक करण्यात आली आहे, तर काहींनी एफआयआर दाखल करण्यासाठीही पुढाकार घेतला आहे. सध्या कटकमधील १३ पोलिस ठाण्यांमध्ये संचारबंदी लागू आहे.कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी, शहरात ६० तुकडया पोलिस दलाच्या तैनात करण्यात आल्या आहे.याशिवाय, शांतता राखण्यासाठी आणि पुढील अशांतता टाळण्यासाठी संवेदनशील ठिकाणी आणि चौकांमध्ये रॅपिड अॅक्शन फोर्स (आरएएफ), बीएसएफ, सीआरपीएफ आणि ओडिशा स्विफ्ट अॅक्शन फोर्ससह निमलष्करी दलांच्या आठ कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule