राजस्थानसह ७ राज्यांमधील पोटनिवडणुकांच्या तारखा जाहीर
नवी दिल्ली , 6 ऑक्टोबर (हिं.स.)। बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. या वेळी निवडणूक दोन टप्प्यांत होणार असून ६ आणि ११ नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार आहे. निवडणूक आयोगाने हेही जाहीर केले आहे की, सहा राज्ये आणि एका केंद्रशासि
राजस्थानसह ७ राज्यांमधील पोटनिवडणुकांच्या तारखाही जाहीर


नवी दिल्ली , 6 ऑक्टोबर (हिं.स.)। बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. या वेळी निवडणूक दोन टप्प्यांत होणार असून ६ आणि ११ नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार आहे. निवडणूक आयोगाने हेही जाहीर केले आहे की, सहा राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील आठ जागांवर उपनिवडणुका देखील याच दिवशी होतील. यामध्ये जम्मू-काश्मीर, राजस्थान, झारखंड, तेलंगणा, पंजाब, मिझोराम आणि ओडिसा या मतदारसंघाचा समावेश आहे. या सर्व निवडणुकांचे निकाल १४ नोव्हेंबर रोजी, बिहार निवडणुकीच्या निकालासह जाहीर होतील.

बिहारमध्ये दोन टप्प्यांत निवडणुका घेण्याचा निर्णय भाजप आणि राजदच्या मागणीनंतर घेण्यात आला आहे. बिहार विधानसभेत एकूण २४३ जागा असून संपूर्ण राज्यात निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू आहे. याचसोबत निवडणूक आयोगाने सात राज्यांतील आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये उपनिवडणुका घेण्याचीही घोषणा केली आहे. या उपनिवडणुका त्या जागांवर होत आहेत, ज्या विविध कारणांमुळे रिक्त झाल्या आहेत.

जम्मू आणि काश्मीर – बडगाम आणि नागरोटा: उमर अब्दुल्ला यांच्या राजीनाम्यामुळे आणि देवेंद्र सिंह राणा यांच्या निधनामुळे या जागा रिक्त झाल्या आहेत. राजस्थान – अंटा मतदारसंघ: आमदार कंवरलाल अयोग्य ठरल्यामुळे उपनिवडणूक घेतली जात आहे. झारखंड – घाटशिला अनुसूचित जमातीसाठी राखीव मतदारसंघ: रामदास सोरेन यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली आहे. तेलंगणा – जुबली हिल्स : मंगंती गोपिनाथ यांच्या निधनामुळे उपनिवडणूक होत आहे. पंजाब – तरन तारण: डॉ. कश्मीर सिंग सोहल यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली. मिझोराम – डांपा अनुसूचित जमातीसाठी राखीव मतदारसंघ: ललरिंटलुआंगा सैलो यांच्या निधनामुळे उपनिवडणूक घेतली जात आहे. आणि ओडिसा – नुआपाड़ा : राजेंद्र ढोलाकिया यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली आहे.

या उपनिवडणुका भविष्यात विधानसभा मतांचे संख्याबळ आणि राजकीय समीकरणे यावर प्रभाव टाकू शकतात. निवडणूक आयोग अशा निवडणुका कायदेशीर प्रक्रियेच्या अंतर्गत आणि तत्परतेने आयोजित करत असतो, जेणेकरून लोकशाहीची स्थिरता आणि विश्वासार्हता अबाधित राहील.

बिहार विधानसभेच्या निवडणुकीसोबतच इतर राज्यांमध्ये होणाऱ्या उपनिवडणुकांमुळे राजकीय वातावरण आणखी तापणार आहे. निवडणूक आयोगाने सर्व राजकीय पक्षांना शांतता आणि निष्पक्षतेचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande