अमरावतीत १५ ऑक्टोबरपासून कापूस खरेदी केंद्र सुरू होणार
अमरावती, 9 ऑक्टोबर (हिं.स.) यावर्षीच्या हंगामात भारत कापूस महामंडळाकडून कापूस खरेदी होणार आहे. यासाठी जिल्ह्यात १४ केंद्र दि.१५ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. किमान आधारभूत दराने कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांना कपास किसान अॅपवर नोंदणी करणे आवश्यक आहे.
१५ ऑक्टोबरपासून कापूस खरेदी केंद्र सुरू कपास किसान अॅपवर नोंदणी आवश्यक


अमरावती, 9 ऑक्टोबर (हिं.स.) यावर्षीच्या हंगामात भारत कापूस महामंडळाकडून कापूस खरेदी होणार आहे. यासाठी जिल्ह्यात १४ केंद्र दि.१५ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. किमान आधारभूत दराने कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांना कपास किसान अॅपवर नोंदणी करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना ३१ ऑक्टोबरपर्यंत या ऍपवर नोंदणी करता येणार आहे. कपास किसान मोबाईल अॅपवर नोंदणी केल्यामुळे शेतकऱ्यांना कापूस खरेदीसाठी वेळ आणि तारीख निश्चित केली जाणार आहे. निश्चित केलेल्या वेळेत कापसाची खरेदी होणार आहे. स्लॉट हे अॅप शेतकऱ्यांना त्यांच्या सोयीनुसार सात दिवसांच्या रोलींग आधारावर स्लॉट बुकींग करण्याची सुविधा देणार आहे. कापूस महामंडळात नोंदणी करतेवेळी शेतकऱ्यांच्या मोबाईलवर येणाऱ्या ओटीपीची आवश्यकता राहणार आहे. कापूसाची रक्कम फक्त शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यात जमा केली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा मोबाईल नंबर आधारकार्ड आणि बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे. बन्नी ब्रह्मा आणि एच-४ या जातींसाठी, जर मायक्रोनेअर मूल्य मायक्रोनेअर मूल्य श्रेणीच्या बाहेर असल्यास त्यानंतर प्रत्येक ०.२ मायक्रोनेअर मूल्यासाठी, नियमानुसार किमान आधारभूत किंमतीतून अनुक्रमे २५ रूपये प्रति क्विंटलप्रमाणे कमी केले जाणार आहे. महामंडळ निकृष्ट दर्जाचा, विरंगित कापूस, पावसात, पाण्यात भिजलेला कापूस खरेदी करणार नाही. महामंडळ केवळ बाजार समित्यांद्वारे पडताळणी केलेल्या शेतकऱ्यांकडूनच कापूस खरेदी करणार आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी महामंडळाला कापूस विकण्यापूर्वी बाजार समित्यांच्या अधिकाऱ्यांकडून त्यांची पडताळणी अवश्य करून घ्यावी, असे आवाहन भारतीय कापूस महामंडळाने केले आहे.

आधारभूत किंमत जाहीर

बन्त्री, ब्रम्हा यासाठी निश्चित केलेल्या मापदंडानुसार ८ हजार ११० रूपये, बन्नी, ब्रम्हा स्पेशलसाठी ८ हजार ६० रूपये, एच-४ साठी ८ हजार १० रूपये आधारभूत किंमत जाहीर करण्यात आली आहे. हे किमान आधारभूत दर ८ टक्के आर्द्रता असलेल्या कापूसासाठी लागू आहेत. कापसाच्या विक्रीसाठी कपाशीची कमाल आर्द्रता केवळ १२ टक्के पर्यंतच स्वीकार्य आहे. जर कापसाची आर्द्रता ८ टक्क्‌यापेक्षा जास्त असेल, तर प्रत्येक १ टक्के आर्द्रता वाढली तर किमान आधारभूत किंमत नियमानुसार १ टक्क्यांनी कमी केली जाणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande