बिहार : मतमोजणीसाठी 46 केंद्रांवर तयारी पूर्ण
पाटणा, 13 नोव्हेंबर (हिं.स.) : बिहार विधानसभा निवडणुकीची उद्या, शुक्रवारी मतमोजणी होणार आहे. त्यासाठी राज्यात 46 केंद्रांवर मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे. शुक्रवारी सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरू होईल, प्रथम पोस्टल मतपत्रिका मोजल्या जातील. निवडणूक आय
ईव्हीएम- लोगो


पाटणा, 13 नोव्हेंबर (हिं.स.) : बिहार विधानसभा निवडणुकीची उद्या, शुक्रवारी मतमोजणी होणार आहे. त्यासाठी राज्यात 46 केंद्रांवर मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे. शुक्रवारी सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरू होईल, प्रथम पोस्टल मतपत्रिका मोजल्या जातील. निवडणूक आयोगाने मुक्त आणि निष्पक्ष मतदान सुनिश्चित करण्यासाठी कडक सूचना जारी केल्या आहेत. कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

बिहारमध्ये विधानसभेच्या 243 जागांवर 2 टप्प्यात मतदान घेण्यात आले. पहिल्या टप्प्यात 6 नोव्हेंबर रोजी 121 आणि दुसऱ्या टप्प्यात 11 तारखेला 122 जागांवर मतदान झाले. बिहारमध्ये 203 सामान्य श्रेणीच्या जागा, अनुसूचित जातीच्या 38 जागा आणि अनुसूचित जमातीच्या 2 जागा आहेत. याजांचा निकाल शुक्रवारी 14 नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे. त्यानुषंगाने निवडणूक आयोगाने राज्यभरातील 46 मतमोजणी केंद्रांवर मतमोजणीची तयारी केली आहे. पोस्टल मतपत्रिकांची मोजणी शुक्रवारी सकाळी 8 वाजता सुरू होईल. त्यानंतर, सर्व अधिकाऱ्यांना सकाळी 8.30 वाजता ईव्हीएमची मोजणी सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रत्येक मतमोजणी हॉलमध्ये ईव्हीएम मोजण्यासाठी 15 टेबल असतील. यातील 14 टेबलांवर ईव्हीएम मोजणी केली जाईल आणि एका टेबलावर सहाय्यक निवडणूक अधिकारी काम करतील. प्रत्येक टेबलवर एक मतमोजणी पर्यवेक्षक, एक मतमोजणी सहाय्यक आणि एक सूक्ष्म निरीक्षक कर्मचारी असतील.

निवडणूक आयोगाने सर्व 46 मतमोजणी केंद्रांवर कडक सुरक्षा व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत. मतमोजणी केंद्रांना त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था देण्यात येईल. पहिल्या घेरावात केंद्रीय निमलष्करी दल, दुसऱ्या घेरावात बिहार लष्करी पोलिस आणि तिसऱ्या घेरावात जिल्हा पोलिस तैनात असतील. याव्यतिरिक्त, ईव्हीएम असलेल्या स्ट्राँग रूमवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष सुरक्षा पथके तैनात करण्यात आली आहेत.--------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande