पुण्यातील नवले पुलानजीक दोन कंटेनर-कार यांचा विचित्र अपघात, सात जणांचा मृत्यू
- 20 जण गंभीर जखमी- तब्बल 40 ते 50 लहान-मोठ्या वाहनांचे नुकसान पुणे, 13 नोव्हेंबर (हिं.स.) - पुण्यातील नवले ब्रिजनजीक पुणे-बंगळुरू महामार्गावर दोन कंटेनर आणि कार यांच्यात विचित्र अपघात झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, दोन्ही कंटेनरच्या मधोमध
नवले पुलावर भीषण अपघात


नवले पुलावर भीषण अपघात


नवले पुलावर भीषण अपघात


नवले पुलावर भीषण अपघात


नवले पुलावर भीषण अपघात


- 20 जण गंभीर जखमी- तब्बल 40 ते 50 लहान-मोठ्या वाहनांचे नुकसान

पुणे, 13 नोव्हेंबर (हिं.स.) - पुण्यातील नवले ब्रिजनजीक पुणे-बंगळुरू महामार्गावर दोन कंटेनर आणि कार यांच्यात विचित्र अपघात झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, दोन्ही कंटेनरच्या मधोमध अडकलेल्या कारचा चेंदामेंदा झाला. अपघातानंतर मोठा भडका उडाला आणि गाड्यांनी पेट घेतला. दोन्ही कंटेनरने अचानक पेटही घेतला होता. दरम्यान सात जणांचा जागीच मृत्यू झाला असून 20 जण गंभीररित्या जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेनंतर पुण्यात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नवले पुलानजीक ही अपघाताची घटना घडली आहे. या घटनेत एका कंटनेर चालकाचा ब्रेक फेल झाल्याची प्राथमिक माहिती आहे. यामुळे कंटेनर अनेक वाहनांना धडक देत चालला होता. त्याने बाईक, कार अशा अनेकांना धडक दिली होती. या धडकेनंतर पुढे जाऊन त्याच्या समोर एक कंटेनर आला होता. या कंटेनर आधी एक कार देखील होती. पण कंटेनर चालकाला काहीच करता न आल्याने तो थेट जाऊन कारसह कंटनेरला धडकला. ही धडक इतकी भीषण होती की कार जाऊन थेट कंटेनरच्या मागच्या टायरमध्ये घुसली. त्यामुळे कारचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. या अपघातानंतर कारचा स्फोट देखील झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे दोन्ही कंटेनरला देखील आग लागली. कंटेनरमध्ये चालक आणि हेल्पर, तसेच दुसऱ्या कंटेनरमध्ये चालक असे तिघे जण आणि कारमध्ये एक कुटुंब होतं. साधारण तीन माणसं असण्याचा अंदाज आहे. त्यामुळे सहा जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तर या अपघातात 20 जण गंभीररीत्या जखमी झाल्याची माहिती आहे.

या अपघातातील जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात इतका भीषण होता की, गाड्या एकमेकांना धडकल्यावर मोठा भडका उडाला आणि गाड्यांनी पेट घेतला. आगीच्या ज्वाळा इतक्या उंच होत्या की, दूरवरून या आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट दिसून येत होते. पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी आवश्यक बचाव कार्य सुरू असून यात मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली आहे.

या भीषण अपघातानंतर रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. तसेच अग्निशामन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. दरम्यान कात्रज आणि साताऱ्याकडून मुंबईच्या दिशेने जात आहेत, त्यांनी कुणीही तासभर तरी या महामार्गावर येण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन पोलिसांनी करण्यात आले.

साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने जाणारा राजस्थान पासिंगचा एका ट्रकचा ब्रेक फेला झाला. ब्रेक फेल झाल्यानंतर या ट्रकने घटनास्थळाच्या दोन किलोमीटर अंतर आधीपासूनच वाहनांना धडक देत येण्यास सुरुवात केली. या धडकेत तब्बल 40 ते 50 लहान-मोठ्या वाहनांचे नुकसान झाले असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींकडून देण्यात आली आहे. ज्यामध्ये 20 पेक्षा अधिक लोक गंभीररित्या जखमी झाले आहेत. ज्यामुळे मृतांच्या संख्येत वाढ होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तर या ब्रेक फेल ट्रकने एका कंपनीच्या बसला सुद्धा धडक दिली. ज्यानंतर ही बस पलटी झाली. यामधील सर्वच कंपनी कामगार गंभीर जखमी झाले, ज्यांना तत्काळ जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande