
नवी दिल्ली, 17 नोव्हेंबर (हिं.स.)कोलकाता येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा ३० धावांनी पराभव केला. कोलकाता कसोटी सामना अवघ्या तीन दिवसांत संपला. भारताच्या पराभवामुळे माजी दिग्गज खेळाडू खूप नाराज आहेत, तर इंग्लंडचे माजी कर्णधार मायकेल वॉनने भारतीय संघाची खिल्ली उडवली. वॉनने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली, ज्यात भारतीय संघाच्या पराभवावर टीका केली. त्याच्या पोस्टमध्ये वॉनने लिहिले की, भारतीय संघ कसोटी सामना गमावण्यास पात्र होता.
मायकेल वॉनने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये लिहिले आहे की, अशी खेळपट्टी तयार करा आणि तुम्ही जागतिक कसोटी विजेत्या संघाविरुद्ध पराभूत होण्यास पात्र आहात... दक्षिण आफ्रिकेसाठी एक शानदार विजय. मायकेल वॉनची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे .
कोलकाता कसोटी सामना केवळ तीन दिवसांत संपला. या पराभवानंकर माजी क्रिेकेटपटूंनी विशेषतः खेळपट्टीवर टिप्पणी केली आणि टीम इंडियाच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. माजी फिरकी गोलंदाज अनिल कुंबळेने खेळपट्टीवर नाराजी व्यक्त केली. कुंबळे म्हणाला, मी लहानपणापासून ईडन गार्डन्सवर क्रिकेट खेळत आहे, पण मी कधीही अशी खेळपट्टी पाहिली नाही. कोलकात्याची खेळपट्टी फक्त तीन दिवसांत खराब होत असल्याचे पाहून निराशा होते.
सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत टीम इंडियाचे प्रशिक्षक गौतम गंभीर म्हणाले, असे नाही की खेळपट्टी खेळण्यायोग्य नव्हती. आम्ही जे मागितले होते तेच होते आणि आम्हाला तेच मिळाले. पिच क्युरेटर सुजन मुखर्जी यांनी खूप साथ दिली. मला वाटते की, ही एक अशी खेळपट्टी आहे जी तुमच्या मानसिक कणखरतेची परीक्षा घेऊ शकते, कारण जे चांगल्या बचावासह खेळले त्यांनी धावा केल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे