अहमदपूर : नगराध्यक्षपदासाठी ७ तर नगरसेवकपदासाठी १०९ उमेदवार रिंगणात
अहमदपूर नगरपरिषद निवडणुकीत माघारीनंतर लढतीचे चित्र स्पष्ट लातूर, 22 नोव्हेंबर (हिं.स.)। अहमदपूर नगरपरिषद निवडणूक २०२५ च्या रणधुमाळीत राजकीय घडामोडींना वेग आला असून, आता निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट झाले आहे. नगराध्यक्षपदाचे २ तर नगरसेवकपदाचे
निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. मंजुषा लटपटे


अहमदपूर नगरपरिषद निवडणुकीत माघारीनंतर लढतीचे चित्र स्पष्ट

लातूर, 22 नोव्हेंबर (हिं.स.)।

अहमदपूर नगरपरिषद निवडणूक २०२५ च्या रणधुमाळीत राजकीय घडामोडींना वेग आला असून, आता निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट झाले आहे. नगराध्यक्षपदाचे २ तर नगरसेवकपदाचे ३४ उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले आहेत. त्यामुळे आता नगराध्यक्षपदासाठी ७ आणि नगरसेवकपदासाठी १०९ उमेदवार अंतिम रिंगणात उरले असून ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असल्याचे दिसून येत आहे.

​नगराध्यक्षपदाच्या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे विलास दयासागर शेट्टे यांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे. काँग्रेसकडून कलमोद्दीन अहेमद शेख यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून अभय बळवंत मिरकले आणि भाजपकडून स्वप्निल महारुद्र व्हत्ते हे निवडणुकीच्या मैदानात आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) कडून उमेदवारी डावलण्यात आल्याने नाराज झालेले सय्यद साजिद कबीर यांनी वंचित बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.

​अहमदपूर नगरपरिषदेसाठी नगराध्यक्षपद हे सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी असून एका जागेसाठी ही लढत होत आहे, तर नगरसेवकपदासाठी १२ प्रभागांतून विविध प्रवर्गातील २५ जागांसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीत शहराच्या विकासाचा फैसला एकूण ३७ हजार ६९६ मतदार करणार आहेत. यामध्ये १९ हजार २४४ पुरुष तर १८ हजार ४५२ महिला मतदारांचा समावेश आहे. येत्या २ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून ३ डिसेंबर रोजी निकाल जाहीर केला जाणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. मंजुषा लटपटे यांनी पत्रकार परिषदेत सांगीतले

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande